Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर राजकारण तापलं, ठाकरे-शरद पवार गट आक्रमक, पत्ते अन् काळे झेंडे दाखवले
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. वादग्रस्त वक्तव्य तसेच विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना दिसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आज माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगले आक्रमक झाले आहे. आज धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला आहे. तसेच हातात
माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेल टॉपलाईन बाहेर काळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनो शेती सोडा, रमी खेळा ह.भ.प. माणिक कोकाटे, शेतकऱ्यांनो रमी खेळा, लाखो जिंका, ऑनलाईन रमी, अशा आशयाचे बॅनर्स झळकावत ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटेंचा निषेध केला जात आहे. दरम्यान, टॉपलाईन बाहेर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिकच्या शेतकऱ्याने माणिकराव कोकाना टेंपाठवली मनीऑर्डर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाणी साचल्याने विकत आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही. त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे विक्री करून त्यातून मिळालेले 5550 रुपये त्याने थेट राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरने कृषिमंत्री कार्यालय, मुंबईच्या पत्त्यावर पाठवले आहे. हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा, अशी विनंती या शेतकऱ्याने केली आहे.
आणखी वाचा
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता.....























