एक्स्प्लोर

Anil Desai : ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ, अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

Anil Desai EOW Enquiry : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यांना आज चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

Anil Desai Police Summons : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटासंदर्भात (Thackeray Group) मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणखी एका बड्या नेत्याला समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने  शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भातील चौकशी सुरू केली असून या प्रकरणी अनिल देसाई यांना 5 मार्चला चौकशीसाठी बोलवलं आहे.

अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा जाहीर केल्यानंतर पक्षनिधी खात्यातील 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने तक्रार दाखल केली होती. यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा तपास यंत्रणाच्या रडारावर आला आहे.

अनिल देसाई यांच्यावर नेमका काय आरोप?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष कोणाचा, यावरुन कायदेशीर वाद निर्माण झाला होता. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी अनिल देसाई यांनी तत्परतेने शिवसेना पक्षाच्या बँक खात्यामधील 50 कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे आता अनिल देसाई यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. त्यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं आहे. शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी रुपयांच्या रक्कमेबाबत अनिल देसाई काय स्पष्टीकरण देतात, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी

ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी हेही तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. राजन साळवी यांच्या कुटुंबियांची सोमवारी एसीबीकडून चौकशी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांना एसीबीकडून चौकशीसाठी हजर  राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी राजन साळवी यांच्या कुटुंबियांनी एसीबी कार्यालयात हजेरी लावली.

पाहा व्हिडीओ : अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

महत्त्वाच्या इतर बातम्या :

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expand  : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकारSpecial Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
Embed widget