ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला, ई मेल आयडीवरुन शिंदे गटाच्या अडचणी वाढणार?
Shiv Sena Mla Disqualification case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडी वरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला असताना, शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणात (Shiv Sena Mla Disqualification case ) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या मेल आयडीवर दिले होते, तो मेल आयडी एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde E mail ID) यांचा नाहीच असा दावा शिंदेंच्या वकिलाने केला होता. मात्र आता ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुरावाच सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडी वरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला असताना, शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची गेल्या 5-6 दिवसांपासून उलटतपासणी होत आहे. त्यांच्या उलटतपासणीचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत.
आम्ही मेल पाठवलेला ईमेल आयडी हा एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी आहे, जो विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला.
ठाकरे गटाकडून पुराव्यासह उत्तर (Uddhav Thackeray Group)
एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राच्या ईमेल आयडी शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसंच ईमेल आयडी चुकीचा असल्याचं अध्यक्षांना दिलेल्या अर्जात सांगितलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडून यासंदर्भात पुराव्यासह उत्तर सादर करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका, आपल्या उत्तरांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्व आमदारांचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि त्यासोबतच ईमेल आयडी आहे.
एकनाथ शिंदेंचा ईमेल आयडी (Ekanth Shinde E mail ID)
या पुस्तिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा eknath.shinde@gmail.com आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ठाकरे गटाने नमूद केलेल्या आणि त्यासोबतच बैठकीसाठी पत्र ज्या ईमेल आयडीवर पाठवलं, त्याच ईमेल आयडीचा संदर्भ या पुस्तिकेमध्ये असल्याचा दावा ठाकरे गटाने केला.
शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे यांचा हा मेल आयडी अस्तित्वात नसल्याचा दावा केला होता.शिवाय 2023 च्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत, एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ministereknathshinde@ gmail.com असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. त्याला आता ठाकरे गटाने पुराव्यासह उत्तर दिलं.