मोठी बातमी! मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर..., शिंदे गटाचा भाजपला इशारा
Ramdas Kadam : लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.
Ratnagiri News : मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो, पण पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असं म्हणत रामदास कदमांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
आमचा विश्वासघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी
लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण, माझी एकच खंत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे.
...तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही
युती असताना आम्ही इतका मोठा निर्णय घेतला. विश्वासानं भाजपासोबत आलो आणि मंत्रिमंडळ बनलं. भाजपचे काही नेते भूमिपुजन आणि उद्घाटन स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून करत आहेत. हेच मुळात त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतली पाहिजे. रत्नागिरी, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपचं घृणास्पद राजकारण सुरु आहे.
केसाने गळा कापू नका
लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. 'माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा', असं म्हणत शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
महायुतीत जागावाटपावरुन खलबतं
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चाही केली. लवकरच महायुतीतील जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
पाहा व्हिडीओ : रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :