Dharashiv PavanChakki Case | पवनचक्की मारहाण प्रकरण; 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटूंब आंदोलनाला
Dharashiv PavanChakki Case | पवनचक्की मारहाण प्रकरण; 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटूंब आंदोलनाला
पोलीस अधीक्षक घटनास्थळी आल्याशीवाय आम्ही उठणार नाही, तुळजापूर येथील ठोंबरे कुटुंबीय यांची भूमिका
तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सचिन ठोंबरे कुटुंबीयांचं ठिय्या आंदोलन शेतकऱ्याने तक्रार दिल्यानंतर प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, पोलीस अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत आंदोलनस्थळी चर्चा पवनचक्की गुंडांकडून मारहाण झाल्याचा आरोप तुळजापूर येथील सचिन ठोंबरे यांनी केला. पोलिसांकडून पवनचक्की गुंडाविरोधातील तक्रार घेतली जात नसल्याचा आरोप करत तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर धाराशिव येथील पोलिस उपाअधीक्षक निलेश देशमुख आणि तुळजापूर पोलीस स्थानकातील पी आय रवींद्र खांडेकर आंदोलनस्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याने तक्रार द्यावी यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र सचिन ठोंबरे आणि त्याचं कुटूंबीय महिनाभरापासून आपल्याला न्याय वागणूक मिळाली नाही. त्यामुळे तुळजापूर पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनस्थळी यावं त्याशिवाय आम्ही तक्रार देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तालुक्यातील पवनचक्की मारहाण प्रकरणातील शेतकरी सचिन ठोंबरे यांचे कुटूंबीय आणि तुळजापूर येथील भाजप पदाधिकारी विशाल रोचकरी यांनी ठेकेदार यांच्या मनमानी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं आहे. सचिन ठोंबरे यांच्या पत्नी आणि लहान मुलांना घरी पाठवलं असून इतर लोकांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ आंदोलन सुरू आहे. पोलीस अधीक्षक आंदोलनस्थळी आल्याशीवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे.