Shashikant Shinde on Devendra Fadnavis : देवाभाऊ भावनिक, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता; माथाडी कामगारांच्या घराबाबत शशिकांत शिंदेंकडून आर्त हाक
Shashikant Shinde on Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्त हाक दिली आहे.

Shashikant Shinde on Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना आर्त हाक दिली आहे. माथाडी कामगारांच्या घराबाबत मुख्यमंत्र्यांनी भावनिकपणे निर्णय घ्यावा. ‘देवाभाऊ भावनिक आहेत’, असे म्हणत माथाडी कामगार कायदा आणि घरांबाबत निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी शुल्लक आहे, आपण निर्णय घ्यावेत हीच इच्छा आहे. आम्ही विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेतात. ‘आता पक्ष आणि तेवढ्याच संघटना निघतात, हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत. संघटनेची ताकद मोठी आहेत. अशात अण्णासाहेब पाटील यांची संघटना मजबूत ठेवा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, ज्या नेत्याने राज्यात माथाडी कामगार आणला. त्या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष या नेत्यांच्या उपरोक्ष कामगारांच्या एकजुटीवर केला आहे. आजही माथाडी कामगारांचा कामगार या एकाच देवाला पुजतो ते म्हणजे अण्णासाहेब पाटील. बाकीचे लोक केवळ फोटो लावतात. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात आला आहे. बीडला काल मी होतो. तिथे फार वाईट परिस्थिती आहे. आज कामगाराना विनंती करतो की, या देशावर, राज्यावर संकट आल्यावर माथाडी कामगार उभा राहिला आहे. अख्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार या वेळी मदत करणार आहेत. एक दिवसाचा पगार आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहोत, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
देवाभाऊ जाताना काहीतरी पदरात देतील (Shashikant Shinde on Devendra Fadnavis)
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, फडणवीस यांचे मन फार हळवे आहे. माथाडी कामगारांसाठी एक दिवस द्यावा आणि निर्णयाची अंमलबजावणी करावी. आमचे प्रश्न फार काही नाही. आण्णासाहेब यांनी केलेला कायदा जिवंत राहावा. यशवंतराव चव्हाण यांच्यासह सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर लक्ष दिले. आज काही गोष्टी बदलल्या आहेत. आज आमचे देवाभाऊ जाताना काहीतरी पदरात देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कामगारांच्या घरांचा प्रश्न आहे. निकष पाहून काय देता येईल हे पाहावे. वडाळा आणि कांजूरच्या घरांबाबत निर्णय घ्यावा. इकडे सिडकोचे काम सुरू आहे. त्याबाबत आम्ही आंदोलन केले होते. सभागृहात आम्ही विषय मांडले होते. सिडकोच्या घरांच्या किमती खाजगी बिल्डच्या दरापेक्षा जास्त दर आहे. मार्केटच्या समोर कामगार राहत असेल तर चांगले होईल. त्यामुळे तिकडे लक्ष घालून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आम्हाला सत्कार करण्याचा योग येऊ द्या (Shashikant Shinde on Devendra Fadnavis)
कामगार कायदा मोठा आहे की नाही? संचालक मंडळ बदलले आहे. इथे नाशिकचे लोक सुद्धा आहेत. हमाल घेण्याबाबत जो निर्णय घेण्यात येतोय तो तातडीने बदलण्यात यावा. या बाजारपेठमधला बाजारी आणि व्यापारी हे दोन नाणी आहेत. स्वदेशी माल वापरण्याचे आपण अवलंबले आहे. त्यामुळे येणारा माल जर रोखला तर इथला व्यापारी मोठा होईल. बाजार समितीच्या कक्षेत आम्हाला अधिकार द्या. कोणताही बाहेरचा माणूस बाजार समितीवर अन्याय करू शकणार नाही. हा निर्णय घेऊन आम्हाला सत्कार करण्याचा योग येऊ द्या. आम्हाला एकच आधार असावा. जेव्हा मागच्या सरकारांमध्ये कामगारांच्या प्रश्नाला आधार मिळायचा तसाच आधार मिळावा. मला खात्री आहे की, आजचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांचा आश्वासनांचा नाही तर पूर्ततेचा राहील. सरकार म्हणून बळीराजाच्या मदतीला उपस्थित राहिलो याचे समाधान मिळेल, असे देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटले.
आणखी वाचा
























