एक्स्प्लोर

Sunil Tatkare: शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केला का? सुनील तटकरेंनी एका ओळीत संपवला विषय म्हणाले...

Sunil Tatkare on Sharad Pawar MP: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वगळून पक्षातील इतर सात खासदारांच्या (NCP MP) भेटी घेऊन त्यांना यासंबंधीची ऑफर दिल्याची माहिती होती. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. तर दुसरीकडे अनेक आमदार, खासदार, नेते सुरूवातीपासून आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसने नेते अमोल मिटकरी यांनी केलं होतं, त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अशी कोणतीच ऑफर मिळाली नसल्याचं आणि तटकरेंना (Sunil Tatkare) भेटलो नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

काय म्हणालेत सुनील तटकरे?

'मी कधीही कुणाशी संपर्क साधलेला नाही. माध्यमांमध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत', अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkare)  यांनी शरद पवारांच्या खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना तटकरेंनी इन्कार दिला आहे, मी कधीही कोणाला संपर्क साधला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, तर समोर आलेल्या चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे. 

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत - अमोल मिटकरी 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क साधला गेला आहे, का त्यांना ऑफर दिली आहे का? याबाबत एबीपी माझाशी बोलताना पक्षाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, 'प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असं मिटकरी म्हणाले. सात- आठ खासदार येण्यासाठी इच्छूक असतील तर त्याचं स्वागत करतो. निलेश लंके तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. पक्ष जर मजबूत होत असेल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. पक्ष मजबूत झाला पाहिजे, असं अमोल मिटकरींनी सांगितलं.  दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या गुलदस्त्यात आहे. ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं मिटकरींनी म्हटलं.

 मोठी बातमी: शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून 7 जणांना संपर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
सुनील तटकरे शरद पवारांच्या खासदारांना फोनवर नेमकं काय म्हणाले? जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 08 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
सुनील तटकरे शरद पवारांच्या खासदारांना फोनवर नेमकं काय म्हणाले? जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Embed widget