(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar on Election : 'कॅप्टन' बदलणं चुकलं, माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली : शरद पवार
Sharad Pawar on Election : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय तर सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का
Sharad Pawar on Election : पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं निश्चितच झालं. आपनं जवळपास 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय मिळाला आहे असे पवार म्हणाले.
माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली : शरद पवार
दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारलं. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही 'आप'ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. 5 पैकी 4 राज्यात भाजपचं राज्य होतं. पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथला बदल भाजपला अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झालं ते जनतेनं नाकारलेत. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं पवार म्हणाले. युपीत अखिलेशची चूक अजिबात वाटत नाही, ते एकटा लढलेत तिथे, जी मत त्याला पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असे पवार म्हणाले.
जवळपास 14 हजार मतांनी पराभूत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) तब्बल 14 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. आपचे उमेदवार अजीत पाल सिंह कोहली यांना जवळपास 14 हजार मतं मिळाली आहेत. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह हे 4 वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि भाजपशी युती केली. कॅप्टन यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. पण प्रत्यक्षात मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाले आहेत.
काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं?
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Punjab Election Result 2022 : पंजाबमध्ये आपची धडाकेबाज एन्ट्री! काँग्रेसचा सुपडा साफ, भाजप निष्प्रभ... आपच्या यशाचं कारण काय?
- Election Result 2022 : पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपची आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का
- UP Election Result 2022 : गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर