थोरल्या पवारांचं 'अब की बार 225 पार'; विधानसभेत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा, शरद पवार कोणता डाव टाकणार?
Sharad Pawar on Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election 2024: मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) राष्ट्रवादीचे (NCP) आठ जण निवडून आले, आता लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra News) विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर होईल. तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) जिंकेल, असा विश्वास शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. तसेच, निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येतायत, चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात, ही चांगली गोष्ट आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. मात्र चित्र बदलण्याच्या दृष्टीनं लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कौल दिला, ही तर केवळ सुरूवात आहे, महाराष्ट्राचं राजकारण बदलेल अशी अपेक्षा असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे, चित्र बदलवण्याच्या दृष्टीनं लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. राष्ट्रवादीच्या 8 लोकांना निवडून दिलं, ही सुरुवात आहे, 288 जागा आहेत, त्या जागांमधील 225 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे, कष्ट करणार, शक्ति देणार, राज्य आणुया, सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूयात, उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूयात."
पाहा व्हिडीओ : Sharad Pawar : मविआला विधानसभा निवडणुकीत 225 जागा मिळतील, मुंबईतील भाषणात पवारांचं भाकित