एक्स्प्लोर

शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं, पण...; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट

राजकारणात आणि सभागृहात सामाजिक समतोल साधायचा असेल तर प्रतिनिधीत्व एखाद-दुसरं तरी पुढे यायला पाहिजे. पण, त्या प्रतिनिधींना देखील टार्गेट केलं जातंय, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला हिंगोलीतून (Hingoli) सुरुवात केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते मराठा समाजाची संवाद साधून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या भावना मांडताना आरक्षणावर भाष्य केले. तर, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून (Sharad pawar) आपलं तिकीट फायनल झालं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. अखेर, त्यांनी माढा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली.  

राजकारणात आणि सभागृहात सामाजिक समतोल साधायचा असेल तर प्रतिनिधीत्व एखाद-दुसरं तरी पुढे यायला पाहिजे. पण, त्या प्रतिनिधींना देखील टार्गेट केलं जातंय, ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची भावना आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं. यावेळी, तुम्हीही लोकसभा निवडणूक लढवली पण, जनतेनं तुम्हाला नाकारलं, तेव्हा तुम्ही उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेला होतात का? असा प्रश्न हाकेंना विचारला असता, त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. 

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली होती

होय, निश्चितच मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो, त्यावेळी पवारसाहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही डिक्लेर केली होती. मात्र, पुन्हा काय झालं त्याचं त्यांनाच माहिती.. असा गौप्यस्फोटही  लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषेदतून केला. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून हाके यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवारांकडे मांडली होती. तसेच, मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघात मला 5 हजार मतं पडली. कारण, आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ही भावनाच अद्यापही तेथील समाजात नाही. धनगराने कुठं खासदार व्हायचं असतं का, त्याने कुठं तिकीट मागायचं असतं का, गावातल्या तेल्याने, रामोश्याने कुठं लोकसभेचं तिकीट मागायचं असतं का, असे प्रश्न विचारले जातात ही समाजातील फॅक्ट आहे, असे स्पष्टीकरण लक्ष्मण हाकेंनी दिले.  

सामाजिक न्याय कसा मिळणार?

मी शिक्षित आहे, लोकसभा निवडणुकांसाठी काय मेरीट लागतं हे मला चांगलं माहिती आहे. पण, मी निवडणूकच लढवू नये असं नाही. आज संसदेत धनगर समाजाचा एकही खासदार नाही, एवढी मोठी धनगरांची संख्या असूनही एक खासदार नाही. मग, गावगाड्यातील छोट्या-छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व किंवा प्रतिबिंब देशाच्या आणि महाराष्ट्राच्या संसदेत कसं उमटणार, या माणसांना सामाजिक न्याय मिळणार कसा? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. 

महापुरूषांचाही पराभव झालाय

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. महात्मा फुले यांनी दोनवेळा निवडणूक लढवली होती, तर एकदा त्यांना केवळ 2 मते पडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पराभव याच देशात झाला होता. मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे, कारण माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील नव्हते, असे लक्ष्मण हाकेंनी सांगितलं.

लक्ष्मण हाकेंना केवळ 5134 मतं

लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली असून या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. लक्ष्मण हाकेंना केवळ 5134 मतं मिळाली. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या 32 उमेदवारांपैकी त्यांना 6 व्या क्रमांकांची मतं मिळाली आहेत. येथील मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 58,421 मतं मिळाली असून चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारास 20,604 मतं पडली आहेत. पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाचे स्वरुप जानकर उमेदवार होते, त्यांना 7094 मतं मिळाली. तर, सहाव्या क्रमांकावरील लक्ष्मण हाके यांना 5134 मतं पडली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
Embed widget