एक्स्प्लोर

Ramdas Kadam On Sanjay Raut: शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांसाठी मिठाईचे बॉक्स...; नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीनंतर आता रामदास कदम यांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam On Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Ramdas Kadam On Sanjay Raut: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काल (23 फेब्रुवारी) केला होता. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं होतं. नीलम गोऱ्हेंच्या या विधानावरुन कालपासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. तसेच निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हेंवर प्रहार केला. संजय राऊतांच्या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठनेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. नीलम गोऱ्हेंना जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं, की मराठी माणूसच कसा मराठीचा अपमान करतो, असं रामदास कदम म्हणाले. तसेच शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांसाठी मिठाईचे बॉक्स द्यावे लागतात हे आम्हाला माहिती आहे, असा गौप्यस्फोटही रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली. 

संजय राऊत येडं गावला जाऊन पेढं कशाला खात आहात, मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. एका मराठी माणसाला दुसरा मराठी माणूस कसा मागे खेचतो हे नीलम गोऱ्हे यांना सांगायचं होतं. संजय राऊत यांना बोलायची पद्धत राहिली नाही. आपण कोणाला एका उपसभापतींना काय बोलतोय याचं भान नाही. मुघलांंना ज्या प्रकारे संताजी-धनाजी ठिक ठिकाणी दिसायचे तसे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना एकनाथ शिंदे दिसतात. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावल्यने ही जळफळाट आहे, अशी प्रतिक्रिया  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली.

संजय राऊतांना भान असलं पाहिजे- रामदास कदम

नीलम गोऱ्हे यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे काय बोलयाचं...शरद पवारांना संजय राऊत बाप म्हणतात, तुम्ही त्यांच्यावरही टीका करता...संजय राऊतांना भान असलं पाहिजे की ते महिलेबद्दल काय बोलतात...उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून त्यांची पातळी किती खालवली आहेत हेच संजय राऊत दाखवतात, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला. मुघलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा त्यांना पाण्यातही संताजी, धनाजी दिसायचे. तसेच उबाठाच्या लोकांना सगळीकडे शिंदेच दिसतात, असा निशाणा देखील रामदास कदम यांनी साधला. 

संबंधित बातमी:

Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...

Uddhav Thackeray On Neelam Gorhe: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद; नीलम गोऱ्हेंचा आरोप, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget