NCP Party President: जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची चर्चा, आज राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवार भाकरी फिरवणार?
Jayant Patil NCP party President: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Jayant Patil NCP party President: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जनरल बॉडी मीटिंग पार पडणार आहे. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात येईल. सध्या या पदावर जयंत पाटील आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोन टर्म पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आता या पदावर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची निवड होईल, अशी दाट शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आपण भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या केवळ वावड्या असल्याचंही त्यांनी सांगितले.
कोण आहेत शशिकांत शिंदे ?
साताराच्या जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदेंचं मूळ गाव.
माथाडी कामगार ते माथाडी नेता असा प्रवास
एपीएमसीमुळे सातारा ते नवी मुंबई प्रभाव
शरद पवार यांच्या संपर्कात आले, विश्वासपात्र बनले
१९९९ साली जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले.
२००४ सालीही जावळीतून विजयी झाले
२००९ साली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लढले
दोन वेळच्या आमदार शालिनीताईंना हरवून आंमदार बनले
२०१४ साली कोरेगावातून पुन्हा विजयी.
आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदाचीही जबाबदारी
२०१९ मध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून पराभव.
२०२० साली विधान परिषदेवर संधी
२०२४ ची लोकसभा उदयनराजेविरोधात लढले, पराभूत झाले
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही पराभूत .
Jayant Patil: जयंत पाटील भाजप प्रवेशाबाबत काय म्हणाले?
जयंत पाटील हे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी जोरदार सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जयंत पाटील यांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात-मळ्यात सुरु असल्याची कुजबुज आहे. आपल्याला मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाच्या पाच खात्यांपैकी एखादं खातं दिलं तरच आपण भाजपमध्ये प्रवेश करु, अशी अट जयंत पाटील यांनी ठेवल्याचे सांगितले जाते. सध्याच्या घडीला ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना शक्य नसल्याने जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश रखडल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपमधील एका गटाचा जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याची माहिती आहे.
मात्र, जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मला भाजपकडून कोणीही पक्षप्रवेशासाठी विचारलेले नाही किंवा मी कोणाला विनंती केलेली नाही. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाबाबत एवढ्या वावड्या उठत आहेत. तो कुठल्या पक्षात जात आहे, त्याने काय करावं किंवा करु नये, हे सगळं तुम्हीच ठरवत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा























