एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवार इज बॅक, 84 वर्षांचा योद्धा पुन्हा लढाईत उतरणार, पुढच्या तीन दिवसांत दौरे आणि सभांचा धडका

Maharashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी प्रचार करताना शरद पवार यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसत होता. त्यांचा घसा बसल्यामुळे तोंडातून धड शब्द बाहेर पडत नव्हते. तरीही शरद पवार यांनी जिद्दीने प्रचार केला होता.

मुंबई: बारामती लोकसभेच्या लढाईसाठी सर्व शक्ती पणाला लावून लढणाऱ्या शरद पवार यांना रविवारी प्रचंड थकवा आला होता. त्यामुळे त्यांना एक दिवस विश्रांती घ्यावी लागली होती. या विश्रांतीनंतर शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये शरद पवार हे पूर्वीप्रमाणेच दौरे, सभा आणि बैठका घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड धावपळ झाल्याने शरद पवार यांची प्रकृती रविवारी चांगलीच बिघडली होती. त्यामुळे शरद पवार हे नव्या दमाने प्रचाराला सुरुवात करत असले तरी त्यांच्यावर कमी ताण येईल, अशाप्रकारे कार्यक्रम आणि सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 

शरद पवार हे बुधवारी सकाळी दौऱ्याला सुरुवात करुन 10 वाजता अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता शरद पवार हे शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा घेतील. ही सभा आटोपल्यानंतर शरद पवार हे संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या प्रचारासाठी दिवसातील दुसरी सभा घेतील. यानंतर गुरुवारी म्हणजे 9 मे रोजी शरद पवार सकाळी नऊच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात  पोहोचतील. यानंतर शरद पवार संध्याकाळी 6 वाजता अंबेजोगाईत त्यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतील. यानंतर 10 मे रोजी म्हणजे शुक्रवारी शरद पवार हे अंबेजोगाईत नरेंद्र काळे यांनी भेट घेतील. यानंतर साडेअकराच्या सुमारास हॉटेल क्लर्क इन डेक्कनमध्ये होणाऱ्या बैठकीत शरद पवार सहभागी होतील.

शरद पवार प्रचारात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात पु्न्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी अक्षरश: झंझावाती म्हणावा, असा प्रचार केला आहे. शरद पवार यांचे वय बघता ते निवडणुकीत घेत असलेली मेहनत आणि कष्ट अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. 

शरद पवारांच्या 20 दिवसांत 52 सभा, फक्त 4 तास झोप

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये शरद पवार हे प्रचारासाठी राज्यभरात पायाला अक्षरश: भिंगरी लावल्याप्रमाणे फिरले आहेत.  या काळात शरद पवार यांनी 52 सभा आणि तब्बल 25 बैठका घेतल्या होत्या. या सगळ्या व्यग्र वेळापत्रकामुळे शरद पवारांना दिवसाला फक्त चार तासांची झोप मिळाली होती. याचा परिणाम शरद पवारांच्या तब्येतीवर झाला होता. 

बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचा आवाज पार बसला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तरी शरद पवार यांनी भोर आणि इंदापूरमध्ये भाषण केले होते. मात्र, बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवार हे पूर्णपणे थकले होते. ही सभा सुरु असताना त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी होती. या सभेत ते फार बोलूही शकले नव्हते. यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शरद पवार हे मंगळवारी फक्त बारामतीत मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. उर्वरित वेळ त्यांनी घरी राहून आराम केला होता.

आणखी वाचा

रणरणतं ऊन, शरीरात थकवा; आवाज बसलेला.... तरी 85 वर्षाच्या योद्ध्याच्या लेकीसाठी सभा; शरद पवारांनी बारामती गाजवली

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget