एक्स्प्लोर

Satyajit Singh Patankar: शरद पवारांना मोठा धक्का; सत्यजितसिंह पाटणकर भाजपात प्रवेश करणार, पाटणमध्ये नवा राजकीय भूकंप

Satyajit Singh Patankar: सत्यजित सिंह पाटणकर आज भाजपात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करणार आहे.

Satyajit Singh Patankar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) आज (10 जून) सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करणार आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित सत्यजितसिंह पाटणकरांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापनदिन आहे. मात्र यावर्धापनदिनी भाजपकडून शरद पवारांना धक्का देण्यात आला आहे. 26 मे 2025 रोजी पाटणमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज सत्यजितसिंह पाटणकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. सत्यजितसिंह पाटणकरांच्या भाजपाप्रवेशामुळे पाटणमध्ये हा नवा राजकीय भूकंप असल्याचे बोलले जात आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलेलं?

पाटण विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार हर्षद कदम, अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात लढत झाली होती. हर्षद कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रामुख्यानं लढत शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी झाली. या लढतीत शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला.शंभूराज देसाई यांना  125759 मतं मिळाली. तर, सत्यजितसिंह पाटणकर यांना 90935 मतं मिळाली. हर्षद कदम यांना 9626 मतं मिळाली. तर,शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा 34824 मतांनी पराभव केला.  

शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा प्रभाव केला कमी-

सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये गेली अनेक दशके देसई आणि पाटणकर घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र 2014 पासून शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात सलग विजय मिळवत सत्यजितसिंह पाटणकरांचा प्रभाव कमी केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला होता.

2014 पासून पाटण विधानसभेत शंभूराज देसाईंचे वर्चस्व-

पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014 ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 2024 मध्ये देखील शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance: मनसेसोबत युती केल्यास चालेल का?; उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न, शिवसैनिक म्हणाले...

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा झाला? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा झाला? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
Embed widget