VIDEO : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांचा व्हिडीओ; संजय राऊतांचा दावा खरा ठरला?
Sanjay Shirsat Video : मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांच्या बेड शेजारी पैशांची बॅग पाहायला मिळत आहे.

Sanjay Shirsat Video : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांच्यावर आज (दि.11) खळबळजनक आरोप केले होते. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप राऊतांनी केला होता. संजय राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे. कारण संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडीओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.
संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचा काम केले. शिंदे साहेब दिल्लीला अमित शाह साहेबाला भेटले व त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं पाहिलं, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. मुर्खासारखे स्टेटमेंट दिसतात. सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढचं संजय राऊत यांचं चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मातोश्री मातोश्री टू नाहीये. मतदार संघामध्ये व्हिडिओ काढला, त्याचा तसा माझा काय दोष नाहीये. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलावलं जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले. तुम्ही कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. व्हिडीओ कोणीतरी काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















