(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat : होय, मी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजीनामा देणार होतो, गोगावलेंच्या आरोपांनंतर संजय शिरसाटांची कबुली
Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्रिपदावरुन भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचे वेगवेगळे दावे समोर आले आहेत.
मुंबई : शिवसेना आमदार आणि मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यांवर भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राजीनामा देणार होतो, असं देखील संजय शिरसाट यांनी सांगितलं. मात्र, शिरसाट यांनी त्यावेळी तशी भूमिका घेण्याची कारणं काय होती हे मात्र सांगितलं नाही. राजीनामा देणार होतो पण माझ्यामुळं भरत गोगावले नाराज नसल्याचं देखील संजय शिरसाट म्हणाले.
भरत गोगावले यांनी काल अंबरनाथ येथे केलेल्या दाव्यांबाबत विचारलं असता संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका मांडली. सिडकोचं अध्यक्षपद भरत गोगावले यांनी मागितलं नव्हतं, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देखील मागितलं नव्हतं. मी देखील सिडकोचं अध्यक्षपद मागितलं नव्हतं, हे सत्य आहे असंही शिरसाट म्हणाले.
भरत गोगावले काय मी काय आणखी इतर जण मंत्रिपदाच्या शर्यतीत होतो. राजकीय गणितांमुळं मंत्रिमंडळ विस्तार आता होणार, निवडणुकीनंतर होणार, अधिवेशनानंतर होणार याच्या बातम्या पाहिल्या आहेत. त्यामुळं आम्हाला त्रास होतो हे निश्चित आहे. परंतु, भरत गोगावले नाराज आहे किंवा मी नाराज आहे असं नाही आम्हाला शिंदे साहेबांवर विश्वास आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं.
भरत गोगावले आज एसटी महामंडळाची सूत्र स्वीकारणार आहेत. भरत गोगावले मनमोकळ्या स्वभावाचा माणूस आहे. त्यामुळं बोलून जातो, असंही शिरसाट यांनी म्हटलं. भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार असल्यानं नाराज असल्याचं विचारलं असता शिरसाट यांनी फक्त एकाच वाक्यात सांगतो म्हणत प्रतिक्रिया दिली.
पहिल्या दिवशी दोन मंत्री झाले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला होता त्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो, का, कशासाठी, काय घडलं यात मी जाणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांनी आम्हाला महामंडळ दिलं आहे. महामंडळ देऊन बोळवण केलीय असं समजत नाही, आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत,सर्व गोष्टी राजकारणात बोलायच्या नसतात, योग्य वेळ आल्यानंतर बोलू असं म्हणत संजय शिरसाट यांनी काही गोष्टींवर भाष्य करणं टाळलं.
दरम्यान, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यामागचा आमचा कोणताही हेतू नाही. ही फक्त माध्यमांमधील चर्चा आहे. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील याची यात्रा हा फक्त राजकीय स्टंट आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.
इतर बातम्या :