Sanjay Raut : संजय राऊत यांच्या बंगल्याची रेकी करणाऱ्या दुचाकीस्वारांबाबत सर्वात मोठा खुलासा, पोलीस तपासात सर्वकाही समोर
Sanjay Raut , Mumbai : संजय राऊत यांच्या बंगल्याची रेकी करणाऱ्या दुचाकीस्वारांबाबत पोलीस तपासात मोठा खुलासा झालाय.
Sanjay Raut , Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार सुनिल राऊत (Sunil Raut) यांचे मैत्री बंगल्यासमोर रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यास आल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. सकाळी 09.15 वाजण्याच्या सुमारास दोन संशयीत तरुण मोटार सायकलवर राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार देण्यात आली होती.
या तक्रारीवरुन मुंबई पोलीसांनी चौकशी चालू करुन या घटनेची सखोल चौकशी केली असता यामध्ये आढळलेले चार इसम हे सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तपासाठी दहा पथके तैनात केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे या संशियतांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कपूरबावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता हा याचा खुलासा झाला असून संबधीत कंपनीकडून खात्री पोलिसांकडून करण्यात आली आहे.
पोलीस तपासादरम्यान संजय राऊत यांच्या घरी कोणीही रेकी केली नसल्याचे मुंबई पोलिसांना आढळून आले. 4 लोक सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्यूशन कंपनीचे कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे लोक इरेक्शन कंपनीसाठी जिओ मोबाईल नेटवर्कची नेटवर्क टेस्ट ड्राइव्ह करत होते, अशी पोलिसांची माहिती आहे.
अधिकची माहिती अशी की, विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी आज दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास फोनद्वारे कळविले की ,आमदार सुनिल राऊत यांचे मैत्री बंगल्यासमोर सकाळी 09.15 वाजाताचे सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येवुन त्यांचे घराचे रेकी करुन निघून गेल्याचे कळविले. त्यांचे सदर तक्रारीवरुन मुंबई पोलीसांनी चौकशी चालू करुन सदर घटनेची सखोल चौकशी केली असता यामध्ये आढळलेले चार इसम हे सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले असून तशी संबधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला