Sanjay Raut : छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच, संजय राऊतांची टीका
शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .
छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच
छगन भुजबळांवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत. भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामं केलं, ते नाट्य देखील निर्माण करतात. छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत. विधानसभेच्या जागावाटपाचं काहीही ठरलेलं नाही.
ठाकरे गटाकडून नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे.ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याचं समजतयं वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
Sanjay Raut Video : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत
हे ही वाचा :
मोठी बातमी: शिवडी, भायखळा ते विक्रोळी, कलिना ते कुलाबा, मुंबईतील 25 जागांवर ठाकरेंची तयारी