देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावलीये, ते घरात पैसे छापतात? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut on Devendra Fadnavis, नागपूर : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना अनेक योजना राबवल्या. यांचं सरकार आल्यावर यांनी त्या योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावली."
Sanjay Raut on Devendra Fadnavis, नागपूर : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना अनेक योजना राबवल्या. यांचं सरकार आल्यावर यांनी त्या योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावली. ते घरात पैसे छापतात?", असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
सर्व विधानसभा जागा संदर्भात आढावा घेतला
संजय राऊत म्हणाले, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पक्षाचे नेते जाऊन आले. सर्व विधानसभा जागा संदर्भात आढावा घेतला. नागपूर शहरात शिवसेना विधानसभेची एक जागा आणि रामटेक विधानसभेची एक जागा लढवणार आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये शिवसेनेचे काम सुरू आहे. लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळे विधानसभेमध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये महाविकास आघाडी म्हणून जागा लढवू.
आम्ही जिंकलो बुलढाणा थोड्या मताने आम्ही जागा गमावली
यवतमाळ वाशिम आम्ही जिंकलो बुलढाणा थोड्या मताने आम्ही जागा गमावली. महाविकास आघाडीचा यश पाहता विदर्भात चांगला स्कोर करेल.लाडकी बहीण योजनेत खोडा टाकत नाही हे सगळं स्वप्न आहे. त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही, ऐकू येत नाही. महिला बेरोजगार शेतकऱ्यांना फायदा होईल अशी योजना कोणाच्या मालकीची नसून ती सरकारची असते. त्यात खोडा टाकण्याचा पाप आम्ही करणार नाही. नरेंद्र मोदी सरकार यांनी केलं आणि काँग्रेसच्या योजनांना त्यांनी आपले नाव देत गेले. आमचं सरकार आले असते तर सगळं झालं असत. महाराष्ट्रात ते लवकरच होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Dilip Walse Patil : माझी कन्या विधानसभा लढायला तयार नाही, नाईलाजास्तव मलाच उभं राहावं लागेल : दिलीप वळसे पाटील
तीन पक्षात समानता आहे, जागा वाटप बाबत मतभिन्नता नाही
लोकसभेचे निकाल महविकास आघाडीच्या बाजूने लागले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात मोदी-शाह यांचा पराभव झाला. महविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत. तीन पक्षात समानता आहे, जागा वाटप बाबत मतभिन्नता नाही. शिवसेना प्रमुख दिल्लीत होते, त्यावेळी शरद पवार, राहुल गांधी, सोनिया जी यांच्या सोबत बैठका झाल्या. आज आम्ही रणशिंग फंकतो आहे, आज सुरुवात होईल, यानंतर पुढील 3 महिन्यात एकत्रित प्रचार आम्ही करू, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.