एक्स्प्लोर

Pune Accident: डंपरने 9 जणांना चिरडलं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव; अमरावतीहून पुण्यात आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र

Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघतात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणे: अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता, घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरड केली आणि डंपर दुसऱ्या बाजुला घालायला सांगितलं मात्र, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपातवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवरती सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं, 'आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला'.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं, 'सर्वजण झोपले होते. बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडलं होतं. तसाच तो पुढे गेला. आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 

या घटनेबाबत आणखी एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं, पुण्याच्या बाजूने डंपर आला. सगळे खाली फुटपाथवर झोपलेले होते. सगळे आपल्या लहान मुलांसह इकडे-तिकडे झोपलेले होते. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून पुढे पर्यंत वाहन घातलं. जर त्याने दुसऱ्या बाजूला डंपर घातला असता तर पंधरा-सोळा जण डंपर खाली चिरडले गेले असते. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केली त्यामुळे अनेक जण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक-

जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय 1 वर्ष ), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष),  रीनेश नितेश पवार (वय 3) वर्षे अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे तर इतर सहाजण जखमी आहेत.

मृत झालेल्यांची नावं -

1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष 
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष 

जखमी झालेल्यांची नावं- 

1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे   
2. रिनिशा विनोद पवार 18  
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे 
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Embed widget