Sanjay Raut : शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, मौन धारण केल्याच्या चर्चांनंतर भाजपवर हल्लाबोल
मौन धारण केल्याच्या चर्चेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधलाय.
Sanjay Raut Exclusive : मौन धारण केल्याच्या चर्चेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधलाय. ते म्हणाले, भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाला असेल, भारतीय जनता पक्षाला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे कारण मी जेवढे कमी बोलेल तेवढे त्यांना सोयीचं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याबाबत संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडलीय. काय म्हणाले राऊत?
तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल
भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, आज आमचे काही खासदार बोलत आहेत, ते भाजपसोबत आमचं सरकार असतानाही त्यांची हीच खंत होती. ही भूमिका बदलायची असेल तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल. आत्ता जे आमचे नेते बोलत आहेत त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली पाहिजे. कोणतंही आघाडीचे सरकार असलं तरी अशा प्रकारच्या ठिणग्या उडत राहतात. आज जे राष्ट्रवादीवर राग व्यक्त करताहेत त्यांचा काल भाजपवरही राग होता आणि त्या रागातूनच हे सरकार स्थापन झाले आहे
शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याबाबत राऊतांची भूमिका
शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याबाबत संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडलीय. राऊत म्हणतात, विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर शरद पवार हे काम करू शकतात.
नाणार प्रकल्पाबाबत राऊत म्हणाले..
नाणार रिफायनरीबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, विकास प्रकल्पाला शिवसेनेनं कधीच खिळ घातली नाही. 'नाणारमधील नागरिकांचा विरोध आहे, पण तो प्रकल्प होऊच नये असं नाही.
नील सोमय्यांवरील कारवाईवर राऊत म्हणाले...
नील सोमय्यांवर पुढे कारवाई होऊ शकते, असा दावा संजय राऊतांनीन केलाय. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. असे राऊत म्हणाले. कोर्टात काही सांगितलं म्हणून भविष्यात काही नसेल असे नाही. तपास गुप्त पद्धतीने सुरू आहे. कारण गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच राऊत आणि शिवसेनेचा आवाज कुणी बंद करू शकत नाही.
मुंबईत शरद पवार भाजपविरोधी नेत्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता
एकीकडे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केला असताना पवार मुंबईत भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहून आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी नेत्यांची बैठक शरद पवार मुंबईत आयोजित करू शकतात असं सूत्रांकडून कळतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मुंबईत शरद पवार भाजपविरोधी नेत्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता
BJP MP Varun Gandhi यांनी घेतली Shiv Sena MP Sanjay Raut यांची भेट, काय झाली चर्चा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha