Sanjay Rathod: आमचे त्यांच्यासोबतही मित्रत्वाचे संबंध ..संजय राठोड यांचा आदित्य ठाकरेंवर रोख ,म्हणाले 'मतभेद आहेत मनभेद नाहीत'
.शिंदे साहेब बोलतात का मी मात्र ॲक्शन जोरदार करतात .आपल्याकडून असं सूचक वक्तव्यही मंत्री संजय राठोड यांनी केले

Sanjay Rathod: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाचे सेनापती एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद रंगला आहे . उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला जायला नव्हते पाहिजे असे म्हणत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सक्त सूचना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) खासदारांना केल्या आहेत . यावरून शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांनी तिकडे राहिले त्यांच्यासोबत आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत .पाहतोय राजकारण कशा पद्धतीने वळण घेत आहे .मतभेद असू शकतात मात्र मनभेद नक्कीच नाही असं राठोड म्हणालेत .
दरम्यान ,गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाची मोठी चर्चा आहे . यावर राजन साळवी येतात त्यांचे स्वागतच आहे असेही संजय राठोड म्हणाले .
काय म्हणाले संजय राठोड ?
राजकारण कशा पद्धतीने वळण घेताय हे पाहतोय .मतभेद असू शकतात मात्र मनभेद नक्कीच नाही .मी 30 वर्षांपासून शिवसेनेत आहे . उठावात आम्ही सहभागी झालो .तिकडे राहिले त्यांच्यासोबत मित्रत्वाचेच संबंध आहेत आमचे पण ..ऑपरेशन टायगर वर मी बोलण्यापेक्षा तुम्हीच बघा काय होणार .राजन साळवी येत आहेत त्यांचे स्वागतच आहे .शिंदे साहेब बोलतात का मी मात्र ॲक्शन जोरदार करतात .आपल्याकडून असं सूचक वक्तव्यही मंत्री संजय राठोड यांनी केले .दरम्यान वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना शासकीय नोकरीत आणण्याचे धोरण आपण आखले असल्याचं ते सांगत होते .परीक्षा घेतल्या गेल्या आहेत .त्यात माझा ही विभाग होता .पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतल्यात .थोडासा गोंधळ पहिला वेळ झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घेतल्या आहेत . .असंही ते म्हणाले .
आदित्य ठाकरे यांनी काय दिल्या सूचना ?
एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती लावल्याच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे .दरम्यान या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार गुपचूप शिंदे गटाच्या नेत्यांनी आयोजन केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावत असल्याची माहिती समोर आल्याचं कळताच आदित्य ठाकरेंनी दिल्ली गाठत आपल्या खासदारांना शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सूचना दिल्याने खासदार नाराज असल्याचं सांगितलं जात आहे .
हेही वाचा:
























