(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली लोकसभेची मावळात पुनारावृत्ती होणार, भाजपच्या बाळा भेगडेंचे विधानसभेत बंडखोरीचे संकेत
भाजपने अजित पवार गटाच्या जागेवर हक्क दाखवला. त्यासोबतचं महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर भाजप घडाळ्याचा प्रचार करणार नाही, असा ठराव ही मंजूर केला.
पिंपरी-चिंचवड: मावळ विधानसभेत (Maval Vidhan Sabha Election) भाजप (BJP) नेते बाळा भेगडेंनी (Bala Bhegde) बंडखोरी करण्याचे संकेत दिलेत. सांगली लोकसभेने महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे उघडले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला, तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं. हा दाखला देत मावळ विधानसभेत ही बंडखोरी होऊ शकते, याचे स्पष्ट संकेत भेगडेंनी जाहीरपणे दिले. आज मावळ विधानसभेत भाजपने मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केलं. याद्वारे भाजपने अजित पवार गटाच्या जागेवर हक्क दाखवला. त्यासोबतचं महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर भाजप घडाळ्याचा प्रचार करणार नाही, असा ठराव ही मंजूर केला.
बाळा भेगडे म्हणाले, सांगलीच्या जनतेने, कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातीस उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांनी विशाल पाटलांना निवडून दिले. आज मावळ विधानसभेत देखील कार्यकर्त्यांची भावना आणि जनतेची भावना ही मनातील उमेदवार मिळावा या स्वरुपाची भूमिका आहे. मावळ तालुका हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला आहे. 1997 साली रामभाऊ माळगी यांनी मावळ विधानसभेच्या माध्यमातून जनसंघाचे प्रतिनिधित्व केले.मावळ विधानसभेतून सुरू झालेला प्रवास आज राज्याभर पसरलेला पाहायला मिळत आहे.1957 ते2019 पर्यंत सर्वात जास्त आमदार हे जनसंघ आणि भाजपाचे निवडून आले आहे. कार्यकर्त्यांचे संघटन कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकप्रतिनिधी निवडून देणारा अशी मावळ मतदारसंघाची ओळख आहे. परंपरागत विचाराचा असल्याने 2019 च्या निवडणुकीत सुनील शेळके भाजपसोबत शेवटपर्यंत राहिले. परंतु ऐनवेळी त्यांनी आपली भूमिका बदलली म्हणून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. परंतु हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा आहे.
मावळ मतदारसंघ भाजपलाच मिळावा, बाळा भेगडेंची मागणी
बाळा भेगडे म्हणाले, ज्या पक्षाचा आमदार त्यालाच जागा सुटणार असा फॉर्म्युला महायुतीत ठरलेला आहे.त्यामुळे ही जागा सुनील शेळके यांना जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना बाळा भेडगे म्हणाले, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझा पक्ष आणि माझा कार्यकर्ता माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हा मतदारसंघ चुकून राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तर मावळातील कार्यकर्ता आणि विचार जो 1957 पासून प्रेरणा देतो त्याला कुठेतरी मुठमाती मिळेल. म्हणून आमची पक्षाकडे आग्रहाची भूमिका आहे की, हा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे.
निवडणूक लढवण्यासाठी आमची तयारी पूर्ण : बाळा भेगडे
माझ्या पक्षाने सांगितले तुला लढायचे तर मी लढण्यासाठी तयार आहे. आम्ही तयारी करून कामाला लागलो आहे. ज्या व्यक्तीने मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड आहे. या पद्धतीचे राजकारण मावळच्या राजकारणाला सुसंस्कृत नाही. त्यामुळे कार्यकर्ता प्रचंड पेटून उठला आहे, असे बाळा भेगडे म्हणाले.
Video : सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडेंचे मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत
हे ही वाचा :