Sangita Thombare : मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल
Sangita Thombare, केज : केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. संगीता ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
![Sangita Thombare : मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल Sangita Thombare Ex-MLA Sangita Thombare car stoned thombare and driver injured admitted to hospital Maharashtra Politics Marathi News Sangita Thombare : मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/ed59a2ab64cb37760a69e1694c02469d1724856925188924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangita Thombare, केज : केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. संगीता ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दहिफळ वडगाव येथे गेल्यानंतर संगीता ठोंबरे सायंकाळी ऋषी गदळे घरी चहा-पाण्यासाठी जात असताना विजय गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.
माजी आमदार संगीता ठोंबरे जखमी
केजमध्ये झालेल्या दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे संगिता ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis : राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे; कोणाला धमक्या देतील असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)