एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: ''साहेब फडणवीसांवरचा वार तुम्ही झेललात, आता त्यांना उतराई होण्याची संधी, भाजपमध्ये प्रवेश करा''

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद, ओबीसी समर्थक व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत.

Chhagan Bhujbal नाशिक: सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. छगन भुजबळ लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. छगन भुजबळ हे आजच्याघडीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेता आहेत. त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परवडण्यासारखे नाही. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी छगन भुजबळांच्या जाण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो. तसेच छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी लोकनेता भाजप किंवा अन्य पक्षाच्या गळाला लागणे, हे अजित पवार यांच्या पक्षासाठी फारसे भूषणावह नसेल. त्यामुळे आता अजित पवार हे नाशिकला जाऊन छगन भुजबळ यांची समजूत काढतील, असे सांगितले जात आहे.

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद, ओबीसी समर्थक व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. आज नाशिकमध्ये समता परिषद आणि ओबीसीचे समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ओबीसी मोर्चाचे महासचिव राजेंद्र महाडोळे यांनी थेट तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा...राष्ट्रवादीच्या नादी लागू नका, अशी विनंती केली. 

समता परिषद आणि ओबीसीच्या मेळाव्यात कोण काय काय म्हणाले?

साहेबांना मंत्रिपद मिळाले पाहिजे या मताशी मी सहमत नाही.ओबीसीच्या अधिकाराचा प्रश्न, त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेव्याचे म्हणजे ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न आहे. ही आमच्या अधिकारची लढाई आहे, साहेबांची नाही. तुम्ही आम्ही पेटून उठले पाहिजे...ओबीसींच्या जीवाशी तुम्ही खेळत असला तर ती चूक आहे, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा...राष्ट्रवादीच्या नादी लागू नका...तुम्ही ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहेत. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही मागे येणार..., असं ओबीसी मोर्चाचे महासचिव राजेंद्र महाडोळे म्हणाले. - राजेंद्र महाडोळे ,भाजप ओबीसी मोर्चा महासचिव

साहेब फडणवीसांवरचा वार तुम्ही झेललात, आता त्यांना उतराई होण्याची संधी, भाजपमध्ये प्रवेश करा...जरांगे फडणवीस यांच्यावर हल्ला करत असताना भुजबळ मैदानात उतरले आणि तो तुम्हाला टार्गेट करू लागला.- बाळासाहेब कर्डक, समता परिषद पदाधिकारी

मी मराठा समाजाच्या आहे, समता परिषदेच्या सुरवातीपासून आहे. परवा जे झाले ते होवू शकत नाही होणार नाही. माशी कुठे शिंकली ते शिधावे लागेल... भुजबळ यांच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असू शकत नाही. नेत्यांनी फार मोठे पाऊल उचलले आहे. एवढा मोठा नेता ओबीसी समाजाचा आहे राज्यातील एकमेव नेता यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पाहिले प्रदेशाध्यक्ष केले, तेव्हा  मी पहिला जिल्हाध्यक्ष होतो, स्थापनेच्या वेळी मी मेळावा घेतला. आज जी परिस्थिती आली आहे, ती कार्यकर्ते व्यक्त करतील. साहेब तुमच्याशिवाय राज्य चालू शकत नाही तुम्हाला सत्येत बसावे लागेल.- शिवाजीराव नलावडे, (समता परिषद मराठा समाजाचा)

गोपीनाथ मुंडेंनंतर मोठा नेता तुम्ही आहेत. तुम्ही आमचे योद्धे आहेत, शेवटच्या क्षणा प्रयत्न तुमच्यासोबत राहणार...राजकारणी लोकांचा कुटील डाव मोडून काढणार हा ओबीसी चा उठाव देशातून नाही.शरद पवार,अजित पवार या जातीयवादी लोकांना सांगायचे आहे, उठाव परवडणार नाही. लढण्यासाठी तुम्हाला ओबीसीचे नेते लागतो. फडणवीस हुशार आहेत. संयमी आहेत.. ओबीसींचा डीएनए आहेत, तर ओबीसीचा उठाव परवडणारे नाही. पडळकर आणि भुजबळ यांनी मंत्रिमंडळतुन बाहेर ठेवले. संपूर्ण धनगर समाजसोबत आहे. - स्नेहा सोनकाटे, धनगर समाजाच्या नेत्या

भुजबळ यांच्यावर अनन्य झालाय तो कधज पर्यत सहन करणार...महायुतीला जे यश मिळाले त्यात भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. आज आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. भुजबळ भाजपमध्ये गेलेत तर आम्ही त्यासाठी आहोत, मुस्लिम असलो तरी भाजपमध्ये जाणार...ओबीसीच्या समस्या सोडण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे...तुम्ही मोठे नेते व्हा...पण आपल्या मोठ्यानं विसरले नाही पाहिजे. -शब्बीर अन्सारी, भुजबळ समर्थक

आज सत्ता आली ती फक्त ओबीसी समाजामुळे आली आहे.साहबे तुम्ही उपमुख्यमंत्री होणार अशी आम्हाला अपेक्षा होती...समता परिषद ओबीसीचा कणा आहे. सेवादल काँग्रेसच्या मागे होते. तेव्हा काँगेस मजबूत आहे. तुम्ही कुठेही जा समता परिषदसोबत आहे. ओबीसी समाज विखुरला आहे. तुमच्यामुळे एकत्र आहे. ओबीसी समाजाला ताकद दिली तो पक्ष भाजप आहे, मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी ला धक्का लावू देणार नाही ही भूमिका मांडली.-पार्वती शिरसाट, महिला नेत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
Embed widget