एक्स्प्लोर

Abu Azmi : अबू आझमींनी घेतली अजित पवारांची भेट; दोघांमध्ये तासभर चर्चा; अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत शिक्कामोर्तब?  

Abu Azmi Meets Ajit Pawar : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलीय. अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर (Lok Sabha Election 2024) आता साऱ्यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे  (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली. तर महायुतीला काही ठिकाणी जबर फटका बसला आहे. अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून  विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील राजकीय पक्षाकडून अनेक आघाड्या आणि काही नेते आपल्याकडे वळण्याचे प्रयत्न सुरू असताना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi)  यांच्या बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अबू आझमी यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांची दिली आहे. 

अबू आझमी आणि अजित पवारांमध्ये सुमारे तासभर चर्चा

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी नुकतंच अबू आझमी यांच्या अनुषंगाने एक ट्विट केलं होतं. त्यानंतर थेट अबू आझमी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  तसेच या चर्चांना कारण ठरलं होते ते तीन दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घेतलेली भेट. या भेटीतच राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाली, अशी चर्चा सुरु झाली. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आझमी यांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र हाती आलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार  अबू आझमी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या दोघांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाल्याचीही माहिती समोर आले आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचे  विधानसभेत दोन आमदार आहेत. यात रईस शेख आणि अबू आझमी हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी 19 एप्रिलला ईडीच्या प्रमुखांना पत्र लिहित थेट अबू आझमी यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडला आणि त्यानंतर अबू आझमी यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर अबू आझमी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीची बातमी समोर आली. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु झाल्या

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सManikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?Zero Hour Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचंय?Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget