नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला; धंगेकरांवर निशाणा साधणाऱ्या ट्रोलर्सना रोहित पवारांनी फैलावर घेतलं, थेटच सुनावलं
Pune News: भाजपनं या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या ट्रोलिंगला धंगेकरांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे.
![नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला; धंगेकरांवर निशाणा साधणाऱ्या ट्रोलर्सना रोहित पवारांनी फैलावर घेतलं, थेटच सुनावलं Rohit Pawar Tweet on Ravindra Dhangekar Criticize to BJP and Mahayuti On Pune Congress MLA Education Trolling Social Media Post Maharashtra Politics नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला; धंगेकरांवर निशाणा साधणाऱ्या ट्रोलर्सना रोहित पवारांनी फैलावर घेतलं, थेटच सुनावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/24/83fb8f501622b92bf324aedd6d660d9a171125670668793_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Pawar on Ravindra Dhangekar : पुणे : पुण्यातील (Pune News) काँग्रेस (Congress) आमदार आणि काँग्रेसचे पुण्याचे लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे त्यांच्या शिक्षणावरून कमालीचे ट्रोल होत आहेत. पुण्याचा उमेदवार अशिक्षित, केवळ आठवी पास अशा अर्थाचं ट्रोलिंग सोशल मीडियावरून केलं जात आहे. शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.
भाजपनं या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या ट्रोलिंगला धंगेकरांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे, त्यांना त्यांचा पराभव दिसतोय’ असं धंगेकर म्हणाले आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करत धंगेकरांची पाठराखण केली आहे.
शिक्षणावरुन आमदार @DhangekarINC जी यांना भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग हे अत्यंत दुर्दैवी आहे.. माझं शिक्षण हायस्कूलपर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केल्याचं मला आठवतंय… तरीही ते दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. स्व. वसंतदादा… pic.twitter.com/K0dGh69T9b
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, "शिक्षणावरुन आमदार रवींद्रे धंगेकर जी यांना भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझं शिक्षण हायस्कूलपर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केल्याचं मला आठवतंय. तरीही ते दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. स्व. वसंतदादा पाटील यांचं शिक्षण कमी असूनही त्यांच्या मिटींगमध्ये IAS, IPS अधिकाऱ्यांना घाम फुटत असे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही अगदी अलिकडंच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परंतु हे सर्वजण पदावर आहेत. तर दुसरीकडं जे आपल्या नावापुढं डॉक्टर पदवी लावतात त्यांना हाफकिन ही संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नसतं, पण साडेसहा हजार कोटी रुपयांचा मलिदा खायचा, मात्र माहित असतं."
"त्यामुळं शिक्षण आणि लोकसेवा याचा काहीही संबंध नसतो, याचं उत्तर कसब्याच्या पोटनिवडणुकीतच पुणेकरांनी दिलं आहे. त्यामुळं आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात आज कोणतेही मुद्दे नसल्याने आणि आताही पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांना शिक्षणावरुन ट्रोल करणं म्हणजे भाजपच्या IT सेलमध्ये ‘ज्ञानेश्वर विद्यापीठा’तील ‘पदवीधरां’ची भरती असल्याचा पुरावाच आहे, असं म्हणावं लागेल.", असं रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तसेच, रोहित पवार यांनी नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला असा हॅशटॅगही दिला आहे.
विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूधखुळेपणा : रवींद्र धंगेकर
सोशल मीडियावर आठवी पास रवींद्र धंगेकर अशा आशयाचे पोस्टर व्हायरल झाले आहेत. तर विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे, दूधखुळेपणा असा टोलाही विरोधकांना रवींद्र धंगेकरांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)