एक्स्प्लोर

Rohit Pawar & Nilesh Ghaywal: रोहित पवारांनी निलेश घायवळचं राजकीय कनेक्शन उलगडून सांगितलं, बड्या नेत्यांची नावं, धक्कादायक गौप्यस्फोट

Rohit Pawar & Nilesh Ghaywal: कुख्यात गुंड निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी मदत केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar & Nilesh Ghaywal: परदेशात फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे. राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना फोन करुन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी. अथवा गृहमंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रोहित पवार यांनी निलेश घायवळ याचे राम शिंदे, संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोपही केला. निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही बंदुकीचा परवाना देण्यात आला. एरवी व्यापाऱ्यांना गरज असूनही बंदुकीचा परवाना सहज मिळत नाही. पण गुंडाच्या भावाला सहजपणे बंदुकीचा परवाना मिळत असेल तर यामध्ये वरिष्ठ स्तरावरील लोक गुंतले आहेत. त्यामध्ये राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असू शकतो, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. 

एरवी सर्वसामान्य लोकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी बरेच खेटे मारावे लागतात. पण गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळ याला खोट्या नावाने पासपोर्ट दिला जातो. यानंतर तो भारत सोडून परदेशात गेला. निलेश घायवळ अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला गेला असावा. त्यासाठी धाराशिवच्या नेत्याने आणि राम शिंदे यांनी त्याला मदत केली असावी. गौतमी पाटील अपघाताच्यावेळी गाडीत नसूनही भाजपचे मंत्री तिला उचलायची भाषा करतात. मग इतक्या मोठ्या गुंडावर कारवाई का केली जात नाही?  हा निलेश घायवळ बड्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारात दिसतो. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील हे निलेश घायवळ याचे निकटवर्तीय आहेत. या दोघांचे फोटो आणि संभाषणाच्या क्लीपही आहेत. समीर पाटील यांनी निलेश घायवळ याला बऱ्याचदा मदत केली आहे. हे सरकार गुंडांना पाठबळ देते. हे सरकार गुंडांचं आणि कंत्राटदारांचं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Tanaji Sawant and Santosh Banger: घायवळ प्रकरणात तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्यावर रोहित पवारांचे आरोप

राम शिंदे, संतोष बांगर हे निलेश घायवळ याला सहजपणे अधिवेशनात घेऊन येतात. या गुंडाला आत येण्याची परवानगी कशी मिळते? हे गुंड येऊन रिल काढतात. तानाजी सावंत यांचा याप्रकरणाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या कुटुंबातील लोक यामध्ये गुंतले आहेत. जिथे पवनचक्की आहे, तिकडे शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात आल्या. त्यामध्ये निलेश घायवळ याचा सहभाग होता. भ्रष्टाचार आणि गुंडांच्या बाबतीत पुणे शहर एक नंबरला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

घायवळ गँगशी कनेक्शनबाबत धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा आरोप, पुण्यातील वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Embed widget