एक्स्प्लोर

Rohit Pawar : भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट

Rohit Pawar : रोहित पवार यांनी प्रशांत किशोर यांचं अभिनंदन करणारी पोस्ट लिहिताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर बांकीपूरमधून भाजप उमेदवाराचा पराभव करत आमदार झालेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जन सुराजचे नेते प्रशांत किशोर यांचं बांकीपूर मधील विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. रोहित पवार यांनी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचं अभिनंदन करताना एक सूचक संदेश पक्षातील सहकाऱ्यांना देखील दिल्याचं दिसून येतं. बांकीपूरच्या मतदारांनी प्रशांत किशोर यांना विजयी करत भाजपचं (BJP) नाक कापल्याचं रोहित पवार म्हणाले.  रोहित पवार यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. 

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक 'डेडलाईन' असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.

भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ 
त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..! 

आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. 
दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल!

रोहित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

आमदार रोहित पवार यांनी या माध्यमातून भाजपची डेडलाईन या निकालानं जवळ आली आहे, असं निकालानं दाखवून दिल्याचं म्हटलं. तर, अपना टाईम आ गया, थोडा धीर धरा, विजय आपलाच आहे, असा उल्लेख देखील केला आहे. जंतर मंतरवरील आंदोलन, बांकीपूरमधील भाजपचा पराभव पाहता संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही, असं दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. 

प्रशांत किशोर यांचा 18 हजार मतांनी विजय

बिहार विधानसभेच्या बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा 18953 मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना 63203 तर नीरज कुमार यांना 44250 मतं मिळाली. राजदच्या उमेदवार रेखा गुप्ता या पोटनिवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिल्या, त्यांना 14085 मतं मिळाली. गेल्या तीन दशकांपासून बांकीपूरच्या जागेवर भाजपचं वर्चस्व होतं. या पोटनिवडणुकीत भाजपच्या हातून ही जागा निसटली आहे. तर, मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक काँग्रेसनं जिंकली आहे. 
 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget