एक्स्प्लोर

रिपाइं (ए) गट लोकसभेच्या रिंगणात; महाराष्ट्रासाठी विदर्भातील 9 उमेदवारांची यादी जाहीर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं (आंबेडकर) लोकसभेच्या रिंगणात आपपले उमेदवार उतरवले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची आज घोषणा केली आहे.

Republican Party Of India A Group Announced List : मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (ए) (Republican Party of India (A)) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरला असून पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांनी महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची आज घोषणा केली. यामध्ये नागपूर (Nagpur) आणि विदर्भातील (Vidarbha) 9 उमेदवारांचा समावेश आहे. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं (आंबेडकर) लोकसभेच्या रिंगणात आपपले उमेदवार उतरवले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची आज घोषणा केली आहे. यामध्ये नागपूरमधून रेखा गोगले, अमरावती कैलाश मोरे, रामटेक अमोल वानखेडे, भंडारा-गोंदिया कुवरलाल रामटेके, बुलढाणा संतोष इंगळे, वाशिम-यवतमाळ गणेश चंद्रशेखर, हिंगोलीमधून प्रकाश रणवे, वर्धा लोकसभा मतदारसंघातून आर.एस.वानखेडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

रिपाइं (ए) गट लोकसभेच्या रिंगणात; महाराष्ट्रासाठी विदर्भातील 9 उमेदवारांची यादी जाहीर

दीपक निकाळजे कोण? 

दीपक निकाळजे हे गेल्या 20 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. आधी ते रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर त्यांनी आठवले यांच्यापासून वेगळं होत स्वत:चा गट स्थापन केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (आंबेडकर) दीपक निकाळजे यांचा गट म्हणून ओळखला जातो. 

रामदास आठवलेंचा पक्ष किती जागांवर लोकसभा लढवणार? 

रामदास आठवलेंचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं अद्याप किती जागा लढवणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. काही दिवसांपूर्वी बोलताना रामदास आठवलेंनी महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा लोकसभेसाठी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, अशी इच्छा महायुतीकडे जाहीरपणे व्यक्त केली होती. शिर्डीची जागा दिली नाही तर बदल्यात अन्य काही देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असंही ते म्हणाले होते. आम्ही कितीही झालं, तरी इंडिया आघाडीत जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सत्तेत विकास करण्यासाठी राहणं पसंत करू, असं रामदास आठवले म्हणाले होते. आरपीआय पक्ष  छोटा असला तरी महाराष्ट्रात 2 जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही. आमच्या युतीत राज ठाकरे येणं अनपेक्षित, असंही रामदास आठवले म्हणालेले. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असं म्हणत आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget