पु्ण्यातून मविआची रवींद्र धंगेकरांनाच लोकसभेची उमेदवारी , पण वसंत मोरे म्हणतात, खासदार तर मीच होणार!
Vasant More, Pune : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात उतरले आहेत.
Vasant More, Pune : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता. तर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याविरोधात भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, आता वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला इरादा स्पष्ट केला आहे.
खासदार तर मीच होणार
वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "कुठपर्यंत पोहोचला राम राम...गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो. पैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिल आणि मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो. ही घ्या तुमची बातमी म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय... याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार..."
वसंत मोरे अपक्ष लढणार का?
मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसेचा राजीनामा देण्यापूर्वी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. शिवाय वसंत मोरे यांनी पुण्याच्या खासदारकीच्या महत्वकांक्षा कोठेही लपवल्या नव्हत्या. आपण पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहोत, असं त्यांनी अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आता धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या