दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या; आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
Shinde Group on Raosaheb Danve : उद्धव ठाकरे सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या, या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Shinde Group on Raosaheb Danve : "शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं", असं वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझीशी बोलताना केलं होतं. आता दानवेंच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणीस यांना मान्य असेल तर आम्हालाही मान्य, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आमच्या अजून जागा आल्या असत्या अस रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांचं हे मत जर देवेंद्र फडणीस यांना मान्य असेल तर आम्हालाही मान्य असणार आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्रिपदी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याच्या बाबत सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटल आहे की या सगळ्या बाबत आमचे नेते एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील,आणि ते जो निर्णय घेतील तो आमच्या साठी शिर सावंद्या राहणार आहे. त्यांच्या निर्णयावर कोणाची नाराजी असण्याचं कारण नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे पुढे बोलताना म्हणाले, निवडणूक समितीचा प्रमुख असल्याने मी आज भेट घेतली. पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसं ठरलं तसं सुरू आहे कोणताही वादविवाद आमच्यात नाही. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र आमचं मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे. जोवर वरिष्ठांची सही होत नाही तोवर अधिकृत रित्या प्रकाशित होत नाही, असा आमचा पार्टीचा विषय आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या