Ramdas Athawale : मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे; रामदास आठवलेंचा इशारा
Ramdas Athawale : मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे. भाजपने आम्हाला सिरियसली घ्यावे. मी युतीतून बाहेर पडणार नाही. आम्हाला जागा मिळणार आहे.
Ramdas Athawale : मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे. भाजपने आम्हाला सिरियसली घ्यावे. मी युतीतून बाहेर पडणार नाही. आम्हाला जागा मिळणार आहे. आमचे नेते म्हातेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटले आहेत. त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यांनी तुतारी वाजवून प्रचार करावा. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आमचं कमळ लोकांपर्यंत पोहोचलं आहे. मराठा आरक्षणाबाबतही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे. वयोवृद्ध नागरिकांना उपोषण करायला लावू नये, असे आवाहनही आठवले यांनी केलं आहे.
'भाजपने आम्हाला सिरियसली घ्यावं'
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजप आणि आरपीआय युतीबाबतही भाष्य केलं आहे. भाजप आमच्यासोबत दुजाभाव करतो असे नाही. पण चौथा पाय हा आरपीआयचा आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला सिरियसली घ्यावे, असा इशारा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे.
आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक
रामदास आठवले यांनी शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा महायुतीकडे मागितले आहे. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मी लवकरच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याशी चर्चा करेन. परंतु, महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा सोडली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यापूर्वी म्हणाले होते.
महायुतीने मला लोकसभेची निवडणूक लढवू द्यावी. मी स्वत: शिर्डी मतदारसंघातून दोनदा निवडून आलो आहे. तिसऱ्यांदा मला पराभव पत्करावा लागला होता. मी स्वतः शिर्डी लोकसभा मधून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली, पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, अद्याप आरपीआयला भाजपने कोणताही शब्द दिलेला नाही. त्यामुळे रामदास आठवले कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या