एक्स्प्लोर

Ramdas Athawale : मोठी बातमी : राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा, रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale, पालघर : "राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांचा काँग्रेस (Congress) पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही", असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे. ते पालघर (Palghar) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

रामदास आठवले म्हणाले, अजित पवारांमुळे महायुतीच कोणतही नुकसान नाही . लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. मी असल्यामुळे महायुतीने राज ठाकरे यांना घेऊ नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं. 

राहुल गांधी काय काय म्हणाले होते? 

राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारले. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही.  ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते. 

आरक्षण रद्द करण्यासाठी सध्या योग्य वेळ नाही 

आपण आर्थिक बाबींवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी आदिवासींना केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाट्याला येते. त्यांचा देशातील वाटा कमी आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा. मला त्यात अग्रभागी दलित, आदिवासींचे नाव दाखवा, ते दिसणार नाहीत. मला वाटते देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत. पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही. आरक्षण एकमात्र साधन नाही. इतर पण साधन आहेत, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं. 

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर महायुतीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. तर शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी तर राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ, असं बेताल वक्तव्य केलंय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

हायक्वालिफाईड चेहरा अन् खंबीर नेतृत्त्व; राजकारणात असून साधं घर-जमीनही नावावर नाही, कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

iPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगाKhed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
Embed widget