Praful Patel : मोठी बातमी : ना पार्थ पवार, ना बाबा सिद्दिकी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट, राजीनामा देऊन अर्ज भरणार!
Praful Patel names for Rajya sabha Election: दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election Maharashtra) सहा जागांची निवडणूक होत आहे.
Rajya sabha Election : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) आपला उमेदवार जाहीर केला आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आजच महायुती आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election Maharashtra) सहा जागांची निवडणूक होत आहे.
तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत; सुनील तटकरे
प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच 3 वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी, असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं.
वाद टाळण्यासाठी राष्ट्रवादीचं सावध पाऊल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी, असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं.
महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर
राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी महायुतीने त्यांच्या गणितानुसार सर्व 5 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपनं त्यांचे तीन उमेदवार जाहीर केले. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे उमेदवार असतील.
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे रिंगणात
तिकडे काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या वाट्याच्या एकमेव जागेवरुन पक्षाने हंडोरे यांना रिंगणात उतरवले आहे. गेल्यावेळी विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याने हमखास विजयाची खात्री असलेल्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे आणि काँग्रेस हा हिशेब चुकता करणार का, याची आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
6 जागांसाठी मतांचं गणित काय?
या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं आहे, तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे 284 आमदार उरतात भागिले रिक्त जागांची संख्या 6 + 1 = 40.57 राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.57 इतका मतांचा कोटा असेल. भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकेल. काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या