(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल विमानाने आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
प्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूरमधील सभा थेट छत्रपती शाहू महाराजांच्या उमेवारीविरुद्ध असून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक याच्या प्रचारार्थ आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी सभा घेत आहेत. त्यामुळे, राज्याचे लक्ष कोल्हापूरच्या मोदींच्या सभेकडे लागले आहे. मोदींच्या सभेपूर्वी राज्यातील बडे नेते कोल्हापुरात (Kolhapur) पोहोचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरे देताना त्यांनी शरद पवारांवर टीकाही केली. दुसरीकडे मोदींच्या सभेची कोल्हापूरसह, सांगली, साताऱ्यात जोरदार चर्चा रंगली आहे. कोल्हापुरात गादी विरुद्ध मोदी अशा घोषणेतून प्रचार होत असल्याने छत्रपती शाहू महाराजांबद्दल (Shahu Maharaj) मोदी काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, कोल्हापुरात मोदींच्या सभेपूर्वीच आपण राजर्षी शाहू महाराजांचे वंशज असल्याचा दावा करत एकजण सभास्थळी पोहोचल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे.
प्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूरमधील सभा थेट छत्रपती शाहू महाराजांच्या उमेवारीविरुद्ध असून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक याच्या प्रचारार्थ आहे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा दावा करत राजवर्धन कदमबांडे कोल्हापुरातील मोदींच्या सभास्थळी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे धुळ्याहून खास विमानाने राजवर्धन कदमबांडे कोल्हापुरात येणार आहेत. तर, मोदींच्याच व्यासपीठावरुन कदमबांडे भाषण देखील करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, धुळ्याहून येणारे हे कदमबांडे नेमके कोण आहेत? याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कदमबांडे यांच्या एंन्ट्रीमुळे, विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज असल्याचा दावा केल्यामुळे नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना 1962 ला कोल्हापुरात छत्रपती घराण्यात दत्तक घेण्यावरून झाला होता. दत्तक प्रकरणातील हा वाद अद्यापही न्यायालयात असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी यापूर्वीच केला आहे. तर, संजय मंडलिक यांनीही शाहू महाराज हे खरे वारसदार नसून दत्तक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही, कोल्हापूरच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नेत्यांनी संजय मंडलिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, कोल्हापूरच्या गादीचा अवमान केल्याची टीकाही मंडलिक यांच्यावर केली होती. दरम्यान, आता राजवर्धन कदमबांडे यांच्या एंट्रीने नवीनच प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन उमेदवारांसाठी सभा
दरम्यान कोल्हापूर आणि हा
पुणे, सोलापूर, धाराशिवमध्येही मोदींची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदीची आज कोल्हापुरात सभा होत असून पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थही सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 29 एप्रिलला पुण्यात मोदींची सभा होणार आहे. मोदींच्या या पुणे दोऱ्यामुळे पुण्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातही 30 एप्रिल रोजी मोदींची सभा होत आहे.
हेही वाचा
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार