एकनाथ शिंदेंना मारण्याचा उद्धव ठाकरेंचा कट, शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप
Raju Waghmare on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट उद्धव ठाकरे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट आखून सिक्युरिटी नाकारली होती, असा गंभीर आरोप राजू वाघमारेंनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट
राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांना लक्ष केलं. यावेळी ते म्हणाले, रोज रात्री राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याने राऊतांचा सकाळी हँगओव्हर उतरत नाही. सकाळी नशेत ते रोज बडबडत आहेत. मी एक दिवसाआड एक-एक गोष्ट बाहेर काढणार, असा इशारा राजू वाघमारे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंवर राजू वाघमारेंचा गंभीर आरोप
राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता. त्यांना नक्षलवादी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा झेड प्लस सुरक्षा व्यवस्था दिली नव्हती. त्यांच्या एका सहीने सिक्युरिटी मिळत होती, पण त्यांनी शिंदेंना सिक्युरिटी दिली नाही. का, कारण एकनाथ शिंदेंचा जीव गेला पाहिजे म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल, असंही वाघमारे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंना बाजूला करून राऊतांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका
महाविकास आघाडीच्या काळात स्वत: संजय राऊत यांनी सुनील तटकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत हॉटेल हयातमध्ये दोन बैठका संजय राऊतांनी घेतल्या. उद्धव ठाकरेंना बाजूला करूया आणि आपण सत्तास्थापन करुया, यासाठी संजय राऊतांनी दोन बैठका संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या, असा दावा शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे.
आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते
शिंदे बाजूला करुन आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, महाविकास आघाडी असतानाच संजय राऊत यांनी बैठक घेतली. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून बैठक घेतली, असावी त्यांना सगळे पाहिजे होते, असं राजू वाघमारे यांनी
पाहा व्हिडीओ : एकनाथ शिंदे यांना मारण्याचा उद्धव ठाकरेंचा कट
महत्त्वाच्या इतर बातम्या :