Rajabhau Waje : विरोधक म्हणाले, खेड्यातील माणूस याला इंग्रजी नाही कळणार, राजाभाऊ वाजेंनी फाड फाड इंग्रजीत नाशिककरांचा गंभीर प्रश्न मांडला
Rajabhau Waje, Delhi : नाशिकचे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे कार्यकर्ते राजाभाऊ वाझे (Rajabhau Waje) यांनी लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण केलंय.
Rajabhau Waje, Delhi : नाशिकचे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे कार्यकर्ते राजाभाऊ वाझे (Rajabhau Waje) यांनी लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण केलंय. “खेड्यांतील माणूस इंग्रजी जमणार नाही", अशी टीका राजाभाऊ वाजे यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, राजाभाऊ वाजेंनी आता लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आरोग्यविषयक प्रश्न मांडलाय.
राजाभाऊ वाजे काय काय म्हणाले ?
राजाभाऊ वाजे म्हणाले, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आलाय. कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो. नाशिक मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे. यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात. युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे. मात्र, नाशकातील रुग्णालयं अद्यावत नाहीत. शिवाय, इतर सुविधाही रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता. सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून पाऊलं उचलण्याची गरज आहे. शिवाय ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही राजाभाऊ वाजे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजेंचा 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय
नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली होती. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची हॅटट्रिक वाजे यांच्यामुळे हुकली. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने अतिशय मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. हट्टाने घेतलेल्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली नाराजी आणि अॅन्टीइन्कम्बन्सीचा मोठा फटका गोडसे यांना बसला. दहा वर्षांत मतदारसंघात भरीव काम न झाल्याने मोठी नाराजी त्यांच्याबद्दल होती. मात्र, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राने उमेदवारीची घोषणा केल्यामुळे तिकिटासाठी अडून बसलेल्या गोडसेंना राजाभाऊ वाजे यांनी मोठ्या फरकाने पराभूत केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या