मनसेच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यात कोण कोण बोलणार?
Raj Thackreay MNS Gudipadwa Melava 2024 : मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार? कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Raj Thackreay MNS Gudipadwa Melava 2024 : मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार? कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार मैदानात उतरवले नव्हते. 2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. पण महायुतीमध्ये ते सामील होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली होती, त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे महायुतीला मदत करतील, असं वक्तव्य केले होते. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्व राज्याचं लक्ष असेलच.. पण मनसेचे इतर नेतेही गुढीपाडवा मेळाव्यात भाषण करणार आहेत. राज ठाकरे आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास भाषण करतील. त्याआधी पक्षाच्या इतर नेत्यांची भाषणं 5.30-6 ला सुरु होतील.
राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसेकडून नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर काय बोलणार ? कुणावर निशाणा साधणार ? याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मनसे महायुतीमध्ये जाणार का? याचा सप्नेस आज संपणार आहे. राज ठाकरे मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट करतील. आज होणाऱ्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, किशोर शिंदे यांच्यासह मनसे नेते उपस्थित राहणार आहे.
गुढी पाडवा मेळ्याची मनसेकडून जय्यत तयारी
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये करण्यात आली. स्टेजच्या शेजारी लावलेल्या भल्या मोठ्या एलईडी स्क्रीनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण गेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने झालेल्या सभेमध्येस्टेज शेजारी लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीन वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम समुद्रकिनारी अनाधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ सर्वांसमोर आणला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. त्यात यंदा देखील अशा प्रकारे एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज ठाकरे यंदा स्क्रीनवरून काय दाखवतात आणि सभेदरम्यान नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय ?
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून (शिवतीर्थ)राज्यभरातील जनतेशी संवाद साधतात. राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. मध्यंतरी ते महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याकरता त्यांनी भाजपा नेते अमित शाह यांचीही भेट घेतली होती. परंतु, या भेटीत काय चर्चा झाली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या सर्व बाबींवर मेळाव्यातून राज ठाकरे संवाद साधण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय, ते कोणाला साथ देणार, त्यांची रणनीती काय हेही आज राज ठाकरेंच्या भाषणात स्पष्ट होईल.