Raj Thackeray: महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवायला नको? राज ठाकरेंच्या थिंक टँकमधील मेंबरने सांगितली 6 मोठी कारणं
Raj Thackeray-Uddhav Thackeray: हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असेल.
हिंदीसक्तीविरोधात महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी हा सरकारचं त्रिभाषा सूत्राच्याविरोधात आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यातच आता मनसेतील अभ्यासू नेते आणि राज ठाकरेंचं थिंक टँक म्हणून ओळख असणारे अनिल शिदोरे (Anil Shidore) यांनी महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला का नको?, याची सहा कारणे सांगितली आहे.
महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवायला नको?, याची सहा कारणं-
1) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही.
2) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची आकलनशक्ती घडायची तर मातृभाषेशिवाय इतर भाषा फार लादू नयेत, ते एक प्रकारचं ओझं आहे.
3) राजकारण ओळखायचंय: “एक देश, एक भाषा, एक संस्कृती” आणण्याचं राजकारण असल्यानं मला माझी मराठी भाषा आणि संस्कृती ह्यातून हरवेल असा धोका वाटतो.
4) संघराज्य पध्दती पायदळी: “शिक्षण” हा विषय दिल्लीचं संघराज्य सरकार आणि राज्य ह्यांच्यातील समावर्ती (म्हणजे दोघांच्याही) यादीत येतो, त्यामुळे महाराष्ट्रानं स्वत:च्या राज्याचा विचार करून स्वत:चा निर्णय घ्यायला पाहिजे होता, तसं झालं नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
5) माझी मराठी संस्कृती धोक्यात: निष्ठा, मूल्यविचार, आकलनशक्ती, निर्णयशक्ती ह्या गोष्टी ज्या वयात विकसित होतात तेंव्हा मी महाराष्ट्राच्या मुला-मुलींना महाराष्ट्रावर नितांत प्रेम करायला शिकवलं पाहिजे ते यातून पुरेसं होणार नाही, ते मूल मोठं झाल्यावर “जय महाराष्ट्र” म्हणणार नाही.
6) प्रशासकीय: आत्ताच “शिक्षण” प्रशासनात प्रचंड प्रश्न आहेत, कित्येक शिक्षकांची भरती बाकी आहे, दुर्गम भागातल्या एक-शिक्षकी शाळा कशाबशा चालू आहेत त्यात पुन्हा “हिंदी” शिकवण्याचा प्रशासकीय आणि आर्थिक ताण आपण पेलू शकणार नाही. गोंधळ माजेल.
म्हणून, पहिलीपासून महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना “हिंदी” शिकवण्याचा आततायी मार्ग नको. याच कारणासाठी मी मराठी माणसाच्या मोर्च्यात सहभागी होणार आहे.
महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला नको ह्याची सहा कारणं:
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) June 27, 2025
१) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही.
२) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची…
























