एक्स्प्लोर

मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या!

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरेंनी मोदींकडे कोणत्या सहा मागण्या केल्या आहेत.  

1. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.

2. जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. 

3. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत.  गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल.

4.  देशात अनेक रस्ते तयार केलेत. गेली 18-19 वर्षे मुंबई-गोवा महामार्ग तसाच आहे. तो लवकरात लवकर व्हावा, ही विनंती आहे. 

5. बाबासाहेब आंबेडकरांच्या सविंधानांना धक्का लावणार नाही, हे खडसावून सांगा. 

6. देशात लाखो, करोडो मुसल्मान आहे, त्यांची देशावर निष्ठा आहे. पण काही मुठभर आहेत, जे काँग्रेस, ठाकरेंना पाठिंबा देणारे आहेत, त्यांचा उदेश फक्त दहा वर्षात डोक वर करता आलं नाही. डोक वर काढण्याचा सुलभ मार्ग कोणता, तर काँग्रेसशिवाय त्यांना मार्ग नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत आहेत. पण लाखोंच्या संख्येनं मुस्लीम आपल्यासोबत आहे, त्याला शाश्वती हवी, त्याला आदर आहे, त्याला देशामध्ये काम करायचं आहे. नागरिक आहे. तो पिढ्या न पिढ्या राहणार आहे. पण हे मुठभर आहेत, ओवैसीसारख्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे तपासून घ्या.. तिथे माणसं घुसवा. देशाची सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल.

7. मुंबई रेल्वेकडे लक्ष द्यावे,  जास्तीत जास्त पैसे द्यावेत.

मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा 370 कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे 370 कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन
 
2014-19 च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी 2019 ला बोललो. आता 2019 ते आत्तापर्यंतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाहीत. पण 2019 ते 2024 काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे बरोबर 21 वर्षांनी शिवतीर्थावर आलेत. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि 2014 ला आपण कमळाला बाहेर काढलंत.  

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget