एक्स्प्लोर

Raj Thackeray : यावेळीही लोकसभा नाहीच, विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना; राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 2024 : आता काय होतंय त्याचा विचार करू नका, विधानसभेची तयारी सुरू करा अशा सूचना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

मुंबई: चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज करणार नाही असं सांगणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा (Raj Thackeray Supports Narendra Modi) जाहीर करून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली. 

राज ठाकरे हे भाजप-सेना-राष्ट्रवादीच्या महायुतीत येणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यासंबंधित राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेटही झाली होती. त्यानंतर राज ठाकरेंना महायुतीकडून दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ सोडण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरेंचा पक्ष यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चाही सुरू झाली.

पण राज ठाकरे यांनी यावर आता जाहीररित्या पडदा टाकला. आपण यावेळी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी सुरू करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. आपल्याला कोणतीही राज्यसभा वा विधानपरिषदही नको असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. 

सलग तिसरी लोकसभा निवडणूक लढवणार नाही (Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava) 

राज ठाकरे यांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी 2009 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा एकही खासदार निवडून आला नसला तरी अनेक मतदारसंघात त्यांनी लाखांच्यावर मतदान घेतलं होतं. त्यानंतर झालेल्या 2014 सालच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत लोकसभा निवडणूक लढवली नाही. 

नंतर झालेल्या 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विरोध केला खरा, पण त्यावेळीही त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. राज ठाकरेनी त्यावेळी राज्यात अनेक सभा घेतल्या, पण निवडणुका  लढवल्या नाहीत. 

आता मनसेची महायुतीमध्ये सहभाग होण्याची चर्चा सुरू असतानाही राज ठाकरेंचा पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. जागावाटपावर चर्चा झाली त्यावेळी आपण त्यामध्ये रस दाखवला नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच माझ्या पक्षाला कोणतीही राज्यसभेची जागा नको, कोणतीही विधानपरिषदेची जागा नको असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget