एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे अन् जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मनसेचे उमेदवार; ठाण्यात 4 मतदारसंघात राज ठाकरेंचे शिलेदार

लोकसभा निवडणुकांवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

ठाणे : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतील बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांमध्ये एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गेल्याच महिन्यात मराठवाडा आणि विदर्भ दौराही केला आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात करतानाच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, एकापाठोपाठ एक असे एकूण 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात मनसेनं आघाडी घेतल्याचं दिसून आलं. आता, निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसांतच उमेदवार जाहीर होणार आहेत. तत्पूर्वीच, मनसेकडून ठाणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहेत. राज ठाकरेंचे 4 शिलेदार ठाणे जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्धही मनसेचा (MNS) उमेदवार असणार आहेत.

लोकसभा निवडणुकांवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर, काही ठराविक उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठीही जाहीर सभा घेत निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिक व मतदारांना केलं होतं. मात्र, आता विधानसभा निवडणुकांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मनसेकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाण्यात मनसे चारही मतदारसंघात निवडणूक लढणार असून एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाडांविरुद्ध इच्छुक उमेदवारांची नावेही समोर आली आहेत. 

मनसेनं ठाण्यातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण  केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अभिजीत पानसे यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. ठाणे शहर मतदार संघात भाजपच्या संजय केळकर, ओवळा माजिवडा मतदार संघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. पण, स्थानिक पातळीवर चारही जागा लढण्याची तयारी मनसेच्या नेत्यांनी दाखवली आहे. 

कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता 

1. एकनाथ शिंदे विरोधात अभिजित पानसे 
2. संजय केळकर विरोधात अविनाश जाधव 
3. प्रताप सरनाईक विरोधात संदीप पाचंगे
4. जितेंद्र आव्हाड विरोधात सुशांत सूर्यराव

हेही वाचा

दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरारSaif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget