एक्स्प्लोर
Maharashtra Civic Polls: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुपरफास्ट बातम्या
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापलं आहे. सदोष मतदार याद्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि प्रहारचे बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. 'निवडणूक आयोगाचे मालक भारतीय जनता पक्ष आहेत आणि ते त्यांच्या अजेंड्याप्रमाणेच निवडणुका राबवतील', असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे. तर दुसरीकडे, आधी नगरपालिका निवडणुका घेऊन हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनीही मतदार याद्यांमध्ये घोळ असताना निवडणुका घेण्याच्या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याउलट, उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी महायुतीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसनेही महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















