Raj Thackeray : 370 कलम रद्द झालं पण, काश्मीर काय आपण हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि आसामध्येही जमीन खरेदी करु शकत नाहीत : राज ठाकरे
Raj Thackeray, Pune : 370 कलम रद्द झालं पण, काश्मीर काय आपण हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि आसामध्येही जमीन खरेदी करु शकत नाहीत : राज ठाकरे

Raj Thackeray, Pune : "370 कलम काश्मीरमध्ये रद्द झालं. त्याचा अर्थ काय ? तर भारतीय माणूस तिथे जमीन घेऊ शकतो. खरं तर पहिल्यांदा अदानी आणि अंबीनींनी घ्यायला हव्या. म्हणजे लोकांना विश्वास बसेल. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हे काश्मीर पुरतं मर्यादित नाही. तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात, तिथेही भारतीय माणूस जमीन घेऊन शकत नाहीयेत. आसाम आणि मणिपूरमध्ये देखील तुम्ही जमीन घेऊ शकत नाहीत. भारतीय असून सुद्दा...आम्हीच का मोकळीक दिलीये? महाराष्ट्रातच जमीन विकल्या जातात..आमच्याकडे जमीन घ्या, आपल्याकडेच सुरु आहे. तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोठून टिकेल. तुम्ही असाल तर भाषा टिकेल. मला वाटतं महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व देखील टिकवलं पाहिजे. ते टिकणार असेल तर मराठी भाषा शिकेल", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यातील विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचे अस्तित्व शहरात असावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आमची लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर त्याला विकास म्हणत नाहीत. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही. भारतीय असून सुद्धा पण आमच्याकडे तुम्ही या आमची जमीन घेऊन जा. तुमचे अस्तित्व टिकले नाही भाषा कधी टिकेल. मराठी माणसाने अस्तित्व टिकवले पाहिजे. पुस्तकं नवीन मुलांनी वाचवली पाहिजेत. साहित्यिकांनी विनंती आहे, तुम्ही मार्ग दाखवायला पाहिजे. साहित्यिक राजकीय मत मांडायचे, आता मला ते दिसत नाही, चांगलं काय वाईट काय समाजाला सांगितलं पाहिजे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पुस्तकं वाचली जाणार नाही, वाचन कमी झालं आहे, जे काय येतं ते व्हॉट्सॲप वर येतंय. तरुणाईने साहित्य वाचले पाहिजे त्यातून बोध घेतला पाहिजे. संमेलनातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा 10 पुस्तकं जाऊन आणली पाहिजेत. मराठीचा अस्तित्व राहिलं पाहिजे. जिथे जिथे मराठी, महाराष्ट्र जपता येईल तिथे ते जपा. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एक चित्रपट घेऊन येत आहेत.
आता संभाजी महाराज नवीन चित्रपट येतोय. आपल्या महापुरुषांना जातीपाती मध्ये अडकवलं नाही पाहिजे. प्रत्येक महापुरुष आपलाच पाहिजे. जातीपातीतून महाराष्ट्र बाहेर येण्याची गरज आहे. मराठीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचे गरजेचे आहे. मला अतिशय अभिमान आहे की, माझ्या मित्राचा सत्कार माझ्या हस्ते आज करण्यात आला. उदय सामंत आणि त्यांच्या सर्व जणांना मी धन्यवाद देतो. अमेरिकेतून आलेल्या नागरिकांचे सुद्धा मी धन्यवाद देतो, असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

