Raj Thackeray and Devendra Fadnavis : हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
Raj Thackeray and Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली.

Raj Thackeray and Devendra Fadnavis Meeting : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने, राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळत आहे. त्यातच आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पार पडली. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासभर सखोल चर्चा देखील झाली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
फडणवीस-राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘गुप्त’ बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही गोपनीय भेट मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पार पडली. राज ठाकरे हे सकाळी 9.40 वाजता ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दाखल झाले. 10.34 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या हॉटेलमध्ये दाखल झाले.
विशेष म्हणजे, दोन्ही नेते मुख्य प्रवेशद्वार न वापरता हॉटेलच्या स्टाफ गेटमधून आत गेले. ही बैठक हॉटेलच्या 21 व्या मजल्यावर रूम क्रमांक 2102 मध्ये पार पडली. बैठकीवेळी रूमध्ये फक्त राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त इतर कोणीही या बैठकीला बैठकीला उपस्थित नव्हते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही ‘बंद दारामागची’ बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली, तरी मुंबई महापालिका निवडणुका, भाजप-मनसे युती आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेचे नेते उदय सामंतांच्या भेटीला
दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये झालेल्या गुप्त भेटीनंतर काही तासांतच महत्त्वपूर्ण हालचाली पाहायला मिळाल्या. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे थेट शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या ‘मुक्तागिरी’ निवासस्थानी गेले. यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि महायुती यांच्यात युती होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत विचारले असता संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिले की, “राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट का झाली, याची मला माहिती नाही. मी एक प्रस्ताव घेऊन उदय सामंत यांना भेटण्यासाठी आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. युतीसंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते याबाबतीत निर्णय घेत नाहीत, ” असे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका विकासकामाच्या संदर्भात भेटण्यासाठी आले होते, मात्र शिंदे सह्याद्रीवर गेल्यामुळे भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी माझी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. या दोन्ही भेटी पूर्णपणे योगायोग होता. पण, उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी घालायला सुरुवात केली होती तेव्हाच मी म्हटले होते की, राज ठाकरे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत. आज फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी तेच दाखवून दिले, असे उदय सामंत यांनी म्हटले.
आणखी वाचा























