मोठी बातमी! राज ठाकरे सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'या' मुद्यांवर चर्चा
Raj Thackeray : आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामं आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दरम्यान, राज ठाकरे हे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 डिसेंबरलाही 'वर्षा'वर गेले होते. त्यावेळी राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सतत भेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून, विविध मुद्यांवर चर्चा देखील झाली आहे. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामं व कल्याण डोबिंवलीच्या विषयांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याचवेळी आपल्या काही मागण्या राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा...
आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे. विकास कामांसाठी आजची बैठक असल्याचं बोललं जात असलं तरीही, या बैठकीत राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे.
'या' वर्षातील भेटी...
- 27 मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
- 20 एप्रिल 2023 रोजी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह विविध शिष्टमंडळांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
- 7 जुलै 2023 रोजी एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
- 2 डिसेंबर 2023 रोजी राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
- 28 डिसेंबर 2023 रोजी राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
'या' महिन्यातील दुसरी भेट...
यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची 2 डिसेंबरला वर्षा बंगल्यावर भेट झाली होती. यावेळी राज ठाकरे देखील दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यावेळी मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात चर्चा झाली होती. तर, दुकानांवरील ठळक अक्षरातील मराठी पाट्या लावण्यात येत नसल्याच्या मुद्यावर देखील यावेळी चर्चा झाली होती. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी राज ठाकरे यांना कारवाईचे आश्वासन दिले होते. तर, मागील आश्वासनांची आठवण करून देण्यासाठीच आजची भेट झाली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे 'या' महिन्यातील आजची ही दुसरी भेट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: