Rahul Gandhi On GST: जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi On GST: राज्यात भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. आज नांदेड येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.

Rahul Gandhi On GST: ''पंतप्रधान मोदींनी काही वर्षांआधी नोटबंदी केली. रात्री आठ वाजता ते म्हणाले, बंधू आणि भगिनींनो मी 500 आणि हजारांचे नोट आजपासून रद्द करत आहे. काळा पैशाविरोधात मी लढाई लढत आहे. काही दिवसानंतर ते म्हणाले, जर काळा पैसा बंद नाही झाला तर मला फासावर द्या. त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले'', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राज्यात भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. आज नांदेड येथे आयोजित सभेत राहुल गांधी असे म्हणाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''नोटबंदी केली. चुकीची जीएसटी पद्धत लागू केली. पाच वेगवेगळे कर लागू करण्यात आले. तेही 28 टक्के. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला आहे. खतांवर कर. त्यांच्या अवजारांवर कर. जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या आहेत.'' ते म्हणाले, ''लोक म्हणतात 3500 किमी चालत आहेत. याला काही अर्थ नाही. तुम्ही असा विचार नका करू की, हे कठीण काम आहे. हे कठीण नाही तर सोपं काम आहे. तुम्ही यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारू शकता. हे सोपं का आहे, तर यात आम्ही नाही चालत आहे. तुमचं प्रेम आम्हाला पुढे वाढण्याची ऊर्जा देतो.'' राहुल गांधी म्हणाले, ''सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालत आहे. आठ वाजले अजूनही थकलो नाही.''
राहुल गांधी म्हणाले, आम्ही रोज सात-आठ तास चालतो. शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना भेटतो. तुमचं म्हणणं ऐकतो. तुमचं दुःख समजतो. मी एकटाच नाही तर सगळेच काँग्रेसचे नेते. आम्ही त्याच रस्त्यावर चालत आहे. ज्यावर तुम्ही चालतो. ते म्हणाले, आज सकाळी मला दोन लहान मुले भेटले. दोघे भाऊ होते. मी त्यांना विचारलं काय करता, तुम्हाला काय बनायचं आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला , शिकतोय. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. त्याला विचारलं, शाळेत जातो. तो म्हणाला हो जातो. मी त्याला विचारलं तू कधी कॉम्प्युटर पाहिला आहे. तो म्हणाला नाही. मला वाईट वाटलं. मी त्याला विचारलं तुझ्या शाळेत कॉम्प्युटर नाही का? तो म्हणाला नाही. काही नाही आहे कॉम्प्युटर शाळेत? कारण भारतातील सर्व धन दोन-तीन उद्योगपतींच्या हातात चालले आहे. म्हणून शाळेत कॉम्प्युटर नाही.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















