Rahul Gandhi Slams Center: 'अर्थव्यवस्था बुडवणे हेच नोटाबंदीचे एकमेव यश', राहुल गांधींची पुन्हा केंद्र सरकारवर टीका
Rahul Gandhi Slams Center: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Rahul Gandhi Slams Center: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षांनी (Opposition Parties) रविवारी नोटाबंदीवरून (Demonetization) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर (Centers Narendra Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ''2016 च्या निर्णयाचे एकमेव दुर्भाग्यपूर्ण यश म्हणजे भारताची अर्थव्यवस्था बुडणे.''
राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वार्षिक अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट टॅग केला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100 टक्के आणि 2,000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या दोन्ही नोटा जारी करण्यात आल्या आहेत.
The only unfortunate success of Demonetisation was the TORPEDOING of India’s economy. pic.twitter.com/S9iQVtSYSx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 29, 2022
तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते डेरेक ओब्रायन यांनीही आरबीआयच्या अहवालावरून सरकारवर निशाणा साधला. TMC नेत्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्कार. नोटाबंदी आठवते? नोटाबंदीवर तुम्ही काय वचन दिले होते की, सर्व बनावट चलन नष्ट केले जातील? हा आहे आरबीआयचा नवा अहवाल, ज्यामध्ये बनावट नोटांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे.
Namaskar Mr PM @narendramodi DEMONETIZATION ?
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) May 29, 2022
Remember ? And how @MamataOfficial swiftly took you on ?
How you promised the nation Demo would WIPE OUT ALL COUNTERFEIT CURRENCY.
Here's the latest RBI report pointing out the huge increase in counterfeit notes👇 pic.twitter.com/ipmQXUF8BY
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी जुन्या 1,000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, ज्याचा उद्देश काळ्या पैशाला आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याला आळा घालणे होत.