एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil: 'तुम्ही भांडण लावायचं काम केलं, कन्येच्या विजयाची चिंता करा'; विखेंचं पवारांना जशास तसे उत्तर

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar: खोटं बोला, पण रेटून बोला हा त्यांचा धंदा आहे, असं म्हणत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar: शिर्डी:  शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. शरद पवारांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्व देत नाही. खोटं बोला, पण रेटून बोला हा त्यांचा धंदा आहे, असं म्हणत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर पक्ष बदलावरुनही टीका केली होती. यावर शरद पवारांमध्ये सातत्य कुठे आहे?, कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात, कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. काँग्रेसमधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचं, असा निशाणा राधाकृष्ण विखे पाटलांनी साधला. 

...त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही-

तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले आता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना लगावला. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखेंपासून त्यांना विरोध करण्याची परंपरा शरद पवारांनी आजही कायम ठेवली आहे. जिल्ह्यात (Ahmednagar Lok Sabha Constituency) नेते नेत्यांमध्ये नेहमी भांडणं लावायचं काम केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. शरद पवारांनी नगर जिल्ह्यात जास्त सभा घ्यावा हाच आमचा आग्रह आहे. त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं, हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे 10 उमेदवार तुम्हाला देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या थोरात यांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा मात्र तुमचा अपयश तुम्ही मान्य करा, असंही ते म्हणाले.

मनसेच्या पाठिंबामुळे महायुतीची ताकद वाढली-

मनसेच्या पाठिंबामुळे महायुतीची ताकद निश्चितच वाढली आहे. मनसेने आमचा प्रचार केल्यामुळे आम्हाला फायदाच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र प्रदेश कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे, असं विखे-पाटील म्हणाले. 

बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीकास्त्र-

संपदा पतसंस्थेमुळे बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आले. त्यांच्याच एका बँकेच्या चेअरमन 134 कोटींचा घोटाळा केला, तो आज जेलमध्येसुद्धा आहे. तुमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये जातात याचा विचार बाळासाहेबांनी करावा. रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेवर माझ्यावर थोरात आरोप करतात. त्यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार आहे. माफियांना पाठीशी घालून आम्ही राजकारण करत नाही.

शरद पवार काय म्हणाले?

मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी विखे-पाटलांना लगावला. अहमदनगरमध्ये मविआ विरुद्ध महायुती (Ahmednagar Lok Sabha Constituency) अशी न राहता विखे विरुद्ध पवार अशी असल्याचे चित्र रंगवले जात असल्याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. शरद पवार हे अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

संबंधित बातमी:

ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget